ETV Bharat / city

Nawab Maliks bail : जामीनासाठी माजी मंत्री नवाब मलिक यांची सत्र न्यायालयात पुन्हा धाव

माजी मंत्री नवाब मलिक यांनी (Nabab Malik) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल (bail application in PMLA Special court) केला आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (Financial Abuse Case) नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडी (ED) कडून अटक करण्यात आली होती.

Nabab Malik's bail
नबाब मलिक
author img

By

Published : Jul 6, 2022, 2:10 PM IST

मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik PMLA case ) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. मनी लाँड्रिग ( Money Laundering case of Nawab Malik ) प्रकरणांमध्ये फेब्रुवारी मध्ये ईडी कडून अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणे कडून कुठलेही सबळ पुरावे देण्यात आले नसल्यामुळे मला जामीन मिळावा अशी मागणी नवाब मलिक यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जात करण्यात आली आहे.

टेरर फंडिंग असल्याचा आरोप: मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते पैसे दाऊदला दिले. असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी मलिक यांना अटक केली. तेव्हापासून म्हणजे पाच महिन्यापासून मलिक न्यायालयीन कोठडीमध्येच आहेत. ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. आतापर्यंत तपास यंत्रणे कडून कुठलेही सबळ पुरावे दिले नसल्याने, जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला 15 जुलै पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

३ एकर जमीन खरेदीचा आरोप : नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर ( Hasina Parkar land sale ) हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

पत्नी आणि मुलाचीही चौकशी: मंत्री नवाब मलिक यांचे पुत्र आणि पत्नी या दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु त्यापैकी कोणीही हजर झाले नाही. नवाब मलिक यांच्या पत्नीला दोनदा समन्स पाठवण्यात आले होते. त्यांचा मुलगा फराज मलिकला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 5 वेळा समन्स बजावण्यात आले होते. अशी माहिती ईडीच्या आरोपपत्रातून मिळाली आहे. मलिक यांचे पुत्र आणि पत्नी या दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु त्यापैकी कोणीही हजर झाले नाही. मलिक यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेलला मी 2002 सालापासून मी ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता अशी कबुली मलिक यांनी ईडीला दिली होती.

सलीम पटेल हसीना पारकरचा निकटवर्तीय - गोवावाला कम्पाउंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक यांचाही महत्वाचा भाग आहे. 2005 साली मलिक यांनी सलीम पटेल विषयी लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलं असंही मलिक यांनी म्हटलं आहे. सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता. हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची. गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला 5 लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात 5 लाख आणि चेकमध्ये 5 लाख असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते अशीही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : बंगळुरूमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण : तृतियपंथीयांनी केली तरुणीची सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.