ETV Bharat / city

Letter Of Former Mayor : सभागृहाने घेतलेल्या निर्णयात आयुक्तांचा हस्तक्षेप; माजी महापौरांचे आयुक्तांना नाराजी पत्र

मुंबई महापालिकेत (BMC) आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित सर्व कारभार सुरू आहे. स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या प्रस्तावांना विरोधकांनी आक्षेप घेतल्याने पालिका आयुक्तांनी ते प्रस्ताव रद्द केले ( BMC proposal canceled ) आहेत. यावर नाराज होऊन माजी महापौर यांनी आयुक्तांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

Kishoritai Pednekar
किशोरीताई पेडणेकर
author img

By

Published : May 23, 2022, 5:22 PM IST

Updated : May 23, 2022, 5:39 PM IST

मुंबई : महापालिका आयुक्त व प्रशासक विरोधकांच्या दबावाला बळी पडून मुंबई महानगरपालिकेत स्थायी समिती ( Standing Committee in BMC ) आणि पालिका सभागृहाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करून ते निर्णय रद्द करीत आहेत. हा महापालिका सभागृहाचा अवमान असल्याने मुंबईचे माजी महापौर ( Former mayor ) किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तशी नाराजी माजी महापौरांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र पाठवून ( Letter of displeasure from former mayor ) व्यक्त केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात : महानगरपालिकेच्या कार्यकाळात महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित खात्यांकडून प्रशासकाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येत आहेत असे समजते. महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी घेणे उचित ठरणार नाही. विरोधकांच्या दबावाला बळी पडू नका. पालिका सभागृह आणि स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयात बदल करीत आहे. हा सभागृहाचा अवमान आहे, अशी आठवण माजी किशोरी पेडणेकर यांनी पत्राद्वारे करून दिली आहे.

भाजपच्या तक्रारीवर टेंडर झाले रद्द : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला होता. तरीही प्रशासनाकडून सारवासारव करीत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करावे आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेची निःपक्षपातीपणे तपासणी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमित साटम यांनी लेखी पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे. राणीच्या बागेत 290 करोड रुपये खर्च करून प्राण्यांसाठी पिंजरे बनवले जाणार होते. यात भ्रष्टाचार असल्याचे सांगत त्याविरोधात माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले.

हेही वाचा : Dispensary in Mumbai : मुंबईकरांच्या घराजवळ विविध सुविधायुक्त १३ दवाखाने, उपचार आणि तपासणी करणे होणार सोपे

Last Updated : May 23, 2022, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.