ETV Bharat / city

Cricketer Vinod Kambli Cybercrime : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची सायबर चोरांकडून फसवणूक - Vinod Kambli

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची सायबर चोरांनी फसवणूक केली आहे. केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने कांबळी याच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी १ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविले. याप्रकरणी कांबळी यांने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची सायबर चोरांकडून फसवणूक

author img

By

Published : Dec 10, 2021, 1:35 PM IST

Updated : Dec 10, 2021, 1:41 PM IST

मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची सायबर चोरांनी फसवणूक केली आहे. केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने कांबळी याच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी १ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविले. याप्रकरणी कांबळी यांने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची सायबर चोरांकडून फसवणूक
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची सायबर चोरांकडून फसवणूक

बँक खात्याचे केवायसी अपडेट नसल्याची माहिती त्याने दिली

विनोद कांबळीच्या मोबाइलवर ३ डिंसेबर रोजी एका व्यक्तीने फोन केला. त्याने कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याचे केवायसी अपडेट नसल्याची माहिती त्याने दिली. केवायसी अपडेट न केल्यास खात्यामधील व्यवहार बंद होतील असे त्याने सांगितली. त्यामुळे कांबळी याने ऑनलाइन केवायसी अपडेट करण्याची तयारी दर्शवली.

१४ हजार रुपये परस्पर वळविले

केवायसीच्या प्रतिनिधीने कांबळी याच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवरील जाऊन अॅप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी देण्यास सांगितले. कांबळी याने ओटीपी देताच त्याच्या मोबाइलचा ताबा (एक्सेस) या प्रतिनिधीने मिळवला आणि त्याच्या बँक खात्यावरून १ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविले. याबाबत विचारणा करताच समोरील व्यक्तीने कांबळीसोबतचा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळी याने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली.

सायबर पोलिसांची देखील मदत घेणार असल्याची माहिती दिली

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक पुरावे, बँक तपशील आणि मोबाइल क्रमांकावरून आरोपींचा शोध सुरु केला आहे. यासाठी सायबर पोलिसांची देखील मदत घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Mumbai Mayor Death Threats : मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

Last Updated : Dec 10, 2021, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.