मुंबई - काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते मराठवाड्याचा आणि राज्याचा चेहरा तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Former Chief Minister Ashok Chavan हे आता काँग्रेसला Congress सोडचिट्टी देण्याच्या विचारात असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये जाण्याची Ashok Chavan possibility to join BJP दाट शक्यता असून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश Join BJP केल्यास त्यांच्यासाठी सामाजिक न्याय आणि ऊर्जा ही महत्त्वाची खाती राखून ठेवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक चव्हाण का आहेत नाराज ? : माजी मंत्री अशोक चव्हाण हे गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहेत. नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांना पक्षात डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. विश्वास दर्शक ठरावा दरम्यान अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे काही आमदार अनुपस्थित राहिले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जाहीर आभारही व्यक्त केले होते. यानंतर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. उशीर झाल्यामुळे आपण सभागृहात येऊ शकलो नाही, हे सांगूनही कारणे दाखवा नोटीस बजावली गेल्यामुळे ते नाराज झाले आहेत.
भाजपाला हवा आहे मराठवाड्यात चेहरा : दरम्यान भाजपाला मराठवाड्यामध्ये मोठा चेहरा हवा आहे. मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाण यांचे मोठे प्रस्थ आहे. भाजपाच्या मराठवाड्यात रोखण्याचे महत्त्वाचे काम चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण जर भाजपामध्ये आले तर मराठवाड्यामध्येही भाजपाला आपले पाय पसरता येणार आहेत.
'...तर काँग्रेसला मोठा धक्का' : काँग्रेसचे माजी नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे दीड तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजपामध्ये जाण्याच्या आणि तेथील पुनर्वासनाबाबतच्या सर्व बाबींवर चर्चा झाली. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपावासी झाल्यास महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा हादरा बसणार आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - MH Monsoon Session शेतकऱ्यांना प्रति तीन हेक्टरी भरीव मदत, उपमुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा