ETV Bharat / city

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना 20 मार्चपर्यंत अटक नाही - माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याबद्दल बातमी

मीरा-भाईंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर नगरसेविकेन बलात्काराचा आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या प्रकरणात नरेंद्र मेहता यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रद्द व्हावा म्हणून धाव घेतल्याने न्यायालयाने २९ मार्चपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

former-bjp-mla-narendra-mehta-will-not-be-arrested-until-march-29
भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांना 29 मार्च पर्यंत अटक नाही
author img

By

Published : Mar 4, 2020, 4:36 PM IST

Updated : Mar 4, 2020, 5:35 PM IST

मुंबई : मीरा-भाईंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर भाजपच्याच नगरसेविकेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून मेहतांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने माजी आमदार नरेंद्र मेहता यांना पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. नरेंद्र मेहता पोलीस तापासात सहकार्य करत असतील तर त्यांना 20 मार्चपर्यंत अटक करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा -'मुनगंटीवार के सपने' हे पुस्तक आम्ही लवकरच प्रकाशित करू'

तक्रारदार पीडित महिलेच्या जीवाला धोका असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे विभागाच्या डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जावा, अशी मागणी पीडितेचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात केली. मात्र, मेहता यांच्या कुटुंबीयांकडून हे सर्व आरोप बिनबुडाचे असून राजकीय स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला. नरेंद्र मेहता यांच्या याचिकेवर येत्या 20 मार्चला सुनावणी होणार असून यावर दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांना 29 मार्च पर्यंत अटक नाही

हेही वाचा - 'कॅग'चा अहवाल : सुमारे 2 हजार कोटींच्या कामात अनियमितता, फडणवीस सरकारवर ताशेरे

पीडितेची तक्रार -

2001 सालापासून माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पीडित महिलेला लग्नाचे वचन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. 2003 मध्ये नरेंद्र मेहता यांच्याकडून पीडित महिलेला अपत्यही झाले होते. मात्र, त्यानंतरही नरेंद्र मेहता यांनी कुठलीही जबाबदारी न घेता पीडित महिलेसोबत लग्न करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. नरेंद्र मेहता यांनी जातीवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

Last Updated : Mar 4, 2020, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.