ETV Bharat / city

Foreigners Quarantine Compulsory : परदेशी प्रवाशांना आठवड्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन अनिवार्य, स्वखर्चाने करावी लागणार कोविड चाचणी - BMC Guidelines For Foreigners

जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना एका आठवड्यासाठी अनिवार्यपणे संस्थात्मक क्वारंटाईन ( Foreigners Quarantine Compulsory ) ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या आगमनानंतरच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी कोविड आरटी-पीसीआर चाचण्या देखील केल्या जातील.

Foreigners Quarantine Compulsory
संस्थात्मक क्वारंटाईन अनिवार्य
author img

By

Published : Dec 1, 2021, 4:59 PM IST

Updated : Dec 1, 2021, 6:58 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर ( Guidelines For Foreign Travelers ) केल्या आहेत. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता अती जोखीमी देशातून येणाऱ्या प्रवाश्यांना स्वखर्चाने कोविड चाचणी करावी लागणार आहे. तसेच त्यांना एका आठवड्यासाठी क्वारंटाईन ( Foreigners Quarantine Compulsory ) व्हावे लागणार आहे अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत.

स्वखर्चाने कोविड चाचणी करावी लागणार -

युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत ओमीक्रोन विषाणूचा प्रसार झाला आहे. या विषाणूचा प्रसार देशभरात होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आज रात्रीपासून एअरपोर्टवर केली जाणार आहे. आज रात्रीपासून जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना एका आठवड्यासाठी अनिवार्यपणे संस्थात्मक क्वारंटाईन केले जाणार आहे तसेच प्रवाश्यांना स्वखर्चाने कोविड चाचणी करावी लागणार आहे अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विमानतळावर निर्बंध कठोर -

दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रॉनचा संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या यासंदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्वाधिक धोका असलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड काळात मुंबई महापालिकेनेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

संस्थात्मक क्वारंटाईन -

मार्गदर्शक सूचनांनुसार, जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना एका आठवड्यासाठी अनिवार्यपणे संस्थात्मक क्वारंटाईन ठेवणे आवश्यक आहे . त्यांच्या आगमनानंतरच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी कोविड आरटी-पीसीआर चाचण्या देखील केल्या जातील. ओमीक्रोनचा धोका असणाऱ्या अती जोखीमी देशातून येणाऱ्या प्रवाश्यांना स्व खर्चाने कोविड चाचणी करावी लागणार आहे. कौटुंबीक त्रास इत्यादी अपवादात्मक प्रकरणांमध्ये, मुंबईतील विमानतळावर आगमन झाल्यावर चाचणीला परवानगी दिली जाऊ शकते.

आजपासून अंमलबजावणी -

मुंबई विमानतळावरील विमानतळ ऑपरेटरद्वारे तात्काळ या नियमाची प्रभावीपणे अमलबजावणी केली जाईल. आज 2 डिसेंबरच्या रात्री 23:59 वाजल्या पासून हे आदेश कार्यन्वित होतील. मुंबई विमानतळ ऑपरेटरने सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांना कळवावे की त्यांनी, साधारणपणे कोणत्याही प्रवाशाला 72 तास आधी पर्यतचा RT-PCR चाचणी नकारात्मक अहवाल आल्या शिवाय प्रवास करू देऊ नये. प्रवाशांची गैरसोयी टाळण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाच्या योजना पुन्हा तयार करण्यासाठी, सर्व प्रवाशांना जोखमीपासून दोन दिवसांची वेळ देण्याचा प्रस्ताव आहे.

हेही वाचा - Mamata Banerjee visits Mumbai - भाजपच्या बँड पथकाची पश्चिम बंगालच्या वाघिणीने हवा काढली -संजय राऊत

Last Updated : Dec 1, 2021, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.