मुंबई- उच्च न्यायालयाने 22 एप्रिल 2022 पर्यंत संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी कामावर हजर होत आहेत. आतापर्यंत 82 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी 69 हजार कर्मचारी कामावर रुजू झालेले आहे. न्यायालयाने दिलेली मुदत शुक्रवारी संपणार आहे. दोन दिवसांत शंभर टक्के एसटी पूर्वपदावर येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिलीे.
दोन दिवसांत शंभर टक्के एसटी सुरू - परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, न्यायालयाच्या निर्देशानंतर आतापर्यंत 69 हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत. त्यामुळे 82 हजार कर्मचाऱ्यांपैकी 90 टक्के एसटी कर्मचारी कामावर उपस्थित झालेले आहेत. आणखी दोन दिवसांत उर्वरित कर्मचारी कामावर हजर होणार आहेत. आजपासून एसटीची सेवा पूर्ववत झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 22 तारखेपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. आम्हीसुद्धा संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना जवळपास सातवेळा कामावर घेण्याचे आवाहन केले होते. कामावर रुजू होणार्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही असेही आम्ही सांगितले होते. जे न्यायालयाने सांगितले ते यापूर्वी आम्ही सांगितले होते. मात्र, चुकीच्या आवाहनाला कर्मचारी बळी ठरले. त्यामुळे एसटी महामंडळासोबतच नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
कामगारांकडून पैसे उकळून स्वतःची घरे भरली - परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलत असताना गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली. अनिल परब म्हणाले की, दुर्देवाने गरीब कर्मचाऱ्यांना या संपकाळात चुकीचे आश्वासन देऊन भरकटवले गेले. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना कष्टकरी म्हणायचे त्यांच्याकडून पैसे उकळून स्वतःची घरे भरली गेली आहेत. या सगळ्या गोष्टी पाच महिन्यात घडलेल्या या कष्टकऱ्यांच्या जोरावर काही लोकांची श्रीमंती किती वाढली हे आपण पाहत आहोत, येत्या काळात सगळं काही समोर येईल असं बोलत अप्रत्यक्षरीत्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे.
सहा महिन्यानंतर प्रथमच एसटी सेवा पूर्वपदावर-अनिल परब - एसटी पुन्हा रुळावर
संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी कामावर हजर होत आहेत. त्यामुळे 82 हजार कर्मचाऱ्यांपैकी 90 टक्के एसटी कर्मचारी कामावर उपस्थित झालेले आहेत. आणखी दोन दिवसांत उर्वरित कर्मचारी कामावर हजर होणार आहेत. आजपासून एसटीची सेवा पूर्ववत झाली आहे.
![सहा महिन्यानंतर प्रथमच एसटी सेवा पूर्वपदावर-अनिल परब सहा महिन्यांनंतर प्रथमच एसटी सेवा पूर्वपदावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15069896-382-15069896-1650462632967.jpg?imwidth=3840)