ETV Bharat / city

Ganesh Festival Mumbai : यंदा मुंबईत धूमधडाक्यात साजरा होणार गणेशोत्सव, १८५ मंडळांना परवानगी; गाईडलाईन्स जारी

मुंबईमध्ये गणेशोत्सव (Ganesh Festival Mumbai) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रसारामुळे हा उत्सव निर्बंधांमध्ये साजरा करावा लागला होता. मात्र आता निर्बंध दूर सारल्याने पुन्हा एकदा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी, केवळ ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातील १८५ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती (BMC) पालिकेचे गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale Deputy Commissioner Ganeshotsav Coordination of Municipality) यांनी दिली.

Ganesh Festival Mumbai
मुंबई गणेशोत्सव
author img

By

Published : Jul 23, 2022, 7:40 PM IST

Updated : Jul 23, 2022, 9:19 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये गणेशोत्सव (Ganesh Festival Mumbai) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रसारामुळे हा उत्सव निर्बंधांमध्ये साजरा करावा लागला होता. मात्र आता निर्बंध दूर सारल्याने पुन्हा एकदा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी, केवळ ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातील १८५ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती (BMC) पालिकेचे गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale Deputy Commissioner Ganeshotsav Coordination of Municipality) यांनी दिली.

५३० अर्ज दाखल : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळांची तयारी सुरु झाली आहे. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्जांच्या परवानग्यांमध्ये वाहतूक, स्थानिक पोलीस तसेच मुंबई महापालिकेच्या कार्यालयीन परवानगीचा समावेश असतो. मंडप उभारण्यासाठी पालिकेकडे गणेशोत्सव मंडळांकडून परवानग्यांसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत ५३० अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १८५ अर्जांना अर्जांना महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. तर २५४ अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत. ५६ दुबार अर्ज आले आहेत. तर अपूर्ण कागदपत्रांमुळे ३५ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

परवानगी समन्वयासाठी मंडळ-प्रशासनाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप : पालिकेने गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र काही मंडळांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व २४ वॉर्डच्या सर्व मंडळांचा समावेश असलेला स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करावा, अशी मागणी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत समन्वय समितीकडून करण्यात आली होती. याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

१०० कृत्रीम तलाव : सव्वा महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी पालिकेने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यंदा गणपती विसर्जनासाठी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये ३ ते ४ असे सुमारे १०० कृत्रीम तलाव तयार केले जाणार आहेत. आवश्यक भासल्यास यात वाढही केली जाणार आहे. याबाबत सर्व २४ वॉर्डात याची तयारी सुरु करण्याचे निर्देश देण्य़ात आले, असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा : Navi Mumbai: शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलाचे ७५ टक्के काम पूर्ण; भारतातील सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रकल्प

गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी - मुंबईमध्ये कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार (Ganeshostav Guidelines) उत्सवादरम्यान लागणारे सर्व शुल्क मुंबई महापालिकेने माफ केले आहे. तसेच गणेश मुर्त्यांवर असलेले उंचीचे निर्बंध हटवण्यात आले आहे. तरीही भाविकांनी मूर्तीच्या उंचीची मर्यादा स्वखुशीने पाळावी; असे आवाहन (BMC) मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे, तसे परिपत्रक पालिकेने जारी केले आहे.

परिपत्रकात काय म्हटलंय पालिकेने :

1 ) गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी रु .100 / - शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येत आहे . तसेच जर यापूर्वी गणेशोत्सव 2022 साठीच्या मंडपांच्या परवानगीकरीता मंडळांनी शुल्क भरून परवानगी प्राप्त केली असेल तर अशा मंडळांना रु .100 / - चा परतावा लवकरच करण्यात येईल .

2 ) गणेशोत्सव 2022 करिता मूर्तिकारांच्या मंडपांकरिताचे शुल्क प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे माफ करण्यात येईल . तसेच ज्यांनी याअगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल .

3 ) गणेशोत्सव 2022 करिता अनुज्ञापन खात्यामार्फत आकारण्यात येणारे जाहिरात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल . तसेच ज्यांनी या अगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल .

4) महापलिकेच्या मंडप उभारणी बाबत उद्यान खाते व मालमत्ता खाते व खाजगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्कदेखील माफ करण्यात येईल .

5 ) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध 2022 च्या गणेशोत्सवाकरिता असणार नाहीत .

6 ) घरगुती गणेश मूर्तीसाठी या अगोदर 2 फुट उंचीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती . तरी आता घरगुती गणेश मूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही . परंतु घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखूशीने 2 फुट उंचीची मर्यादा पाळण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

7 ) नैसर्गिक विसर्जन स्थळी तसेच कृत्रिम विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येईल .8 ) आगमन व विसर्जन रस्त्यांवर संबंधित विज पुरवठादार यांच्यामार्फत विजेच्या व्यवस्थतेबाबत संबंधित विभागीय आयुक्त यांच्यास्तरावर चर्चा करून आवश्यक ती सुधारणा ( दिवा बत्तीची संख्या व क्षमता) करण्यात येईल .

9 ) मंडप शुल्क माफ करण्यात आले असले तरीसुध्दा विविध परिपत्रकांमध्ये असलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे

Last Updated : Jul 23, 2022, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.