ETV Bharat / city

'या' प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार

बाहेरील देशातून निर्यात केलेला कांदा तसेच मराठा आरक्षणावेळी मराठा समाजातील बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घेणे, पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळण्यासाठी, आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकर बांधण्यात यावे, या आहेत प्रलंबित मागण्या.

maratha kranti morcha
मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार
author img

By

Published : Dec 7, 2019, 7:13 PM IST

मुंबई - मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. बाहेरील देशातून निर्यात केलेला कांदा तसेच मराठा आरक्षणावेळी मराठा समाजातील बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घेणे, पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळण्यासाठी, आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकर बांधण्यात यावे, या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक होत मराठा समाजातील बांधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार

हेही वाचा - बेळगाव सीमाप्रश्न : मुख्यमंत्र्याकडून दोन-समन्वयक मंत्र्याची नियुक्ती, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक

शेतीमालाचे भाव वाढले की शेतीमाल सरकार मोठ्या प्रमाणात आयात करते. पण, तो शेतीमाल जास्त उत्पादित झाला तर सरकार तो माल तातडीने कधीच निर्यात करत नाही. यामध्ये शेतकरी भरडला जातो. या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्यामुळे सरकार शेतीमालाची आयात-निर्यात धोरण राबवताना आवश्यक तो कायदा करतात व या कायद्याचा वापर शासन पातळीवरच होतो. तसेच याचा फटका शेतकरी वर्गाला होतो. म्हणून सरकारने हा कायदा सर्वप्रथम रद्द केला पाहिजे तर, यापुढे महाराष्ट्रात अशा कायद्याचा गैरवापर केला तर, मराठा क्रांती मोर्चा यापुढे सरकारचा हा डाव उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. परदेशी आयात केलेला कांदा व इतर शेतमाल विकू दिला जाणार नाही, अशी भुमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

मराठा आरक्षणाविरोधात काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. उच्च न्यायालयात राज्य सरकारने नामांकित कौन्सिलद्वारे आरक्षण टिकवले, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आरक्षण अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा या नवीन सरकारला मराठा समाज आपला हिसका दाखवेल, अशी भुमिका मराठा समाजाने घेतली आहे.

कोपर्डीप्रकरणी न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. परंतु, त्यासाठी अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून आरोपींना फाशी देण्यात यावी, अन्यथा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे मराठा समाजातील समन्वयकांनी एकत्र येत सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा निवडणुकीपुरता राजकीय पक्ष लक्षात ठेवत आहेत. महाराजांच्या नावाने मते मागतात परंतु, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप सुरू झालेले नाही. तरी सरकारने या बाबतीत लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, ही मागणी देखील मराठा समन्वयकांनी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा समाजातील बांधवांवर जे खोटे गुन्हे लादण्यात आले आहेत, ते देखील या सरकारने येत्या अधिवेशनाच्या अगोदर मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा एकदा मराठा समाज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Intro:मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवणार

बाहेरील देशातून निर्यात केलेला कांदार तसेच मराठा आरक्षणाच्या वेळी मराठा समाजातील बांधवांवर लाभलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी तसेच पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षण मिळण्यासाठी आणि आरक्षण सुप्रिम कोर्टात टिकवण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर बांधण्यात यावे यासाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक होत मराठा समाजातील बांधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार आहे

यात शेतीमालाचे भाव वाढले की तो शेतीमाल सरकारा मोठ्या प्रमाणात आहेत करते पण तो शेतीमाल जास्त उत्पादित झाला तर सरकार त्यांना जाण्याची त्याची तातडीने निर्यात कधीच करत नाही यामध्ये शेतकरी भरडला जातो त्या चुकीचा निर्णय आता आर्थिक भार शेतकऱ्यांच्या माथी पडतो तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो त्यामुळे सरकार शेती मालाची आयात-निर्यात धोरण राबवताना आवश्यक वस्तूंचा कायदा करते व या कायद्याचा वापर शासन पातळीवर जातो फायदा शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे म्हणून सरकारने हा कायदा सर्वप्रथम रद्द केला पाहिजे तर यापुढे महाराष्ट्रात अशा कायद्याचा गैरवापर केला तर मराठा क्रांती मोर्चा यापुढे सरकारचा हा डाव उधळून लावल्या व परदेशी आयात केलेला कांदा व इतर शेतमाल विकून दिला जाणार नाही असा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे

तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहेत उच्च न्यायालयात राज्य सरकारने या पद्धतीने नामांकित कौन्सिल द्वारे आरक्षण टिकवले त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टात राज्यशासनाने नामांकित सांगशील द्यावेत व सुप्रीम कोर्टात आरक्षण अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा या नवीन सरकारला मराठा समाज आपला हिसका दाखवेल अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे

Body:तसेच कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे परंतु त्यासाठी अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून आरोपींना फाशी देण्यात यावी अन्यथा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असे मराठा समाजातील समन्वयकांनी एकत्र येत सांगितले

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा निवडणुकी पुरता राजकीय पक्ष लक्षात ठेवत आहेत महाराजांच्या नावाने मते मागतात परंतु अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप सुरू झालेले नाही तरी शासनाने या बाबतीत लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे याची देखील मागणी मराठा समन्वयक यांनी केलेली आहे तसेच मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा समाजातील बांधवांवर जे खोटे गुन्हे लादण्यात आलेले आहेत ते देखील या सरकारने येते अधिवेशनाच्या काळा अगोदर मागे घ्यावेत जसे आरे प्रकरणातील बांधवांचे गुन्हे मागे घेतले त्याप्रकारे हे गुन्हे देखील मागे घ्यावेत अशी मराठा समाजातील मागणी या सरकारे केलेली आहे या वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा मराठा समाज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरेल असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले आता मराठा समाजातील या प्रलंबित मागण्यांकडे सरकार कशा दृष्टीने पाहता हे व मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.