ETV Bharat / city

Food Price Hike in Mumbai : वाढत्या महागाईने हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दरही वाढले

दिवसेंदिवस महागाई उच्चांक गाठत असताना आता पेट्रोल-डिझेल ( Fuel Rate Hike ) सोबतच तेलाच्या किंमतीही प्रचंड वाढल्या कारणाने याचा परिणाम हातावर पोट असणाऱ्या सामान्य लोकांवर झालेलाच आहे. परंतु हॉटेल व्यवसायाला याचा फटका बसत आहे. या कारणास्तव हॉटेल मधील प्रत्येक पदार्थाची किंमत आता १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. किंबहुना या अगोदर काही हॉटेल मालकांनी आपल्या परीने ही किंमत वाढवलीही आहे. कारण त्यांच्याकडे वाढत्या महागाईला बघता दुसरा पर्याय नाही, असे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगतात.

author img

By

Published : Apr 21, 2022, 6:40 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - दिवसेंदिवस महागाई उच्चांक गाठत असताना आता पेट्रोल-डिझेल ( Fuel Rate Hike ) सोबतच खाद्यतेलाच्या किंमतीही प्रचंड वाढल्या ( Edible Oil Prices Hike ) कारणाने याचा परिणाम हातावर पोट असणाऱ्या सामान्य लोकांवर झालेलाच आहे. परंतु हॉटेल व्यवसायालासुद्धा याचा फटका बसत आहे. या कारणास्तव हॉटेलमधील प्रत्येक पदार्थाची किंमत आता १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. किंबहुना या अगोदर काही हॉटेल मालकांनी आपल्या परीने ही किंमत वाढवलीही ( Food Price Hike ) आहे. कारण त्यांच्याकडे वाढती महागाई बघता दुसरा पर्याय नाही, असे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगतात.

बोलताना आहार संघटनेचे अध्यक्ष

एका लिंबाची किंमत १० रुपये, मग ताटाचं काय.? - मागील महिन्याभरापासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती सोबत एलपीजी गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या हातावर पोट असणाऱ्यांनी जगायचे कसे आणि हॉटेलची चव चाखण्याची हौस असणाऱ्यांनी हॉटेलला जायचे कसे? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत बोलताना आहार हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणतात, साधे एका लिंबूचे उदाहरण घेऊया. पूर्वी आम्ही जेवणाच्या ताटात किंवा काही विशेष पदार्थांसोबत ग्राहकांना एक लिंबू मोफत द्यायचो. शिवाय हात धुण्यासाठी जो फिंगर बाउल दिला जायचा त्यामध्ये सुद्धा लिंबाचा वापर केला जायचा. पण, आता होलसेल बाजारात एका लिंबाचीब किंमत सहा ते दहा रुपये झाली आहे. आता एक लिंबू इतके महाग झाल्याने दुसऱ्या बाबींचा विचार करू शकत नाही, असे ते म्हणाले. प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. मग तो गॅस असो, तेल असो, कडधान्य असो, किराणा मालाचे पदार्थ असो, भाजीपाला असो, तेल असो याचा फटका हॉटेल व्यावसायिकाना मोठ्या प्रमाणामध्ये बसला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव सर्व पदार्थांवर वाढ करणे हे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने 15 ते 20 टक्के वाढ करण्यात येत आहे.

कोरोनातून सावरताना, महागाईचा फटका - दोन वर्षांपासून कोरोनामध्ये ठप्प झालेला हॉटेल व्यवसाय आता कुठे उभारणीला येत असताना वाढत्या महागाईने पुन्हा कंबरडे मोडून टाकले आहे. गावी गेलेले कामगार पुन्हा हॉटेलमध्ये रुजू झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत आहे. पण, महागाई अशीच वाढत राहिली व आमचे हॉटेलचे दरही वाढत राहिले तर सर्वसामान्य माणूस हॉटेलपासूनही दूर जाऊ शकतो. त्या कारणाने पुन्हा त्याचा मोठा फटका आम्हाला येता काळात बसू शकेल की काय, अशी भीतीही शेट्टी यांनी व्यक्त केली.

असे वाढले खाद्यपदार्थाचे दर - वाढत्या महागाईने हॉटेलपासून रस्त्यावरील गाडीवर विकला जाणारा सर्वसामान्यांचा आधार असलेला वडापावदेखील महाग झाला आहे. वडापाव यापूर्वी १२ ते १५ रुपयाला सर्वात कमी दरात विकला जायचा, तो आता कमीत कमी १५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत झालेला आहे. साधे सँडविच १८ रुपयापासून २५ रुपयांपर्यंत होते त्याचे दर आता ३० रुपयापासून ४५ रुपये पर्यंत झालेला आहे. मुंबईत दादर सारख्या ठिकाणी गाडीवर विकला जाणारा अंडा बुर्जी पाव ३५ रुपयांवरुन थेट ४५ रुपयांवर गेला आहे. मुंबईत सामान्य हॉटेलमधील शाकाहारी थाळीचे दर ७५ रुपयांवरून थेट १०० रुपये झाले आहेत. तर गाडीवर विकला जाणारा मिसळ पाव ३२ रूपायांवरून ४५ रुपयांवर गेला आहे. तर सर्वसामान्य विशेष करून युवा वर्गाच आवडते चायनीज फास्ट फूडचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हाफ चायनीज फ्राईड राईसचे दर ३० रुपयांवरून ४५ रुपयांवर गेले आहेत. त्यात अधिक भर म्हणून आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे म्हणून २० रुपयांचे बाटलीबंद पाणी घेणे ही आता गरजेचे असल्याने त्याचाही आर्थिक फटका आता सामान्य नागरिकांना बसत आहे.

स्वस्त काय..? सर्वच महाग - इंधनाचे दर वाढल्याने भाज्यांही दर वाढले आहेत. मागील महिन्याभरात सातत्याने इंधनाचे दर वाढत जात आहेत. त्या कारणाने भाज्यांचे दरही कडाडू लागले ( Vegetables Price Hike ) आहेत. शहरातील किरकोळ भाजी मंडईमध्ये अनेक भाज्यांचे दर प्रतिकिलो ८० ते १०० च्या घरात पोहोचले असून या कारणास्तव सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. भाज्यांचे दर प्रति किलो, फ्लॉवर ६० ते ८० रुपये, टोमॅटो ४० ते ६०, वाटाणा ६० ते ९०, वांगी ६० ते ८०, भेंडी ६० ते ८०, गवार ८० ते १००, कारले ६० ते ८०, फरसबी १०० रुपये, शिमला मिरची ८० रुपये या दराने भाज्यांचे दर वाढले गेले आहेत. इंधन दराचा भडका उडाल्यामुळे बाजारात भाज्यांची आवकही कमी होऊ लागली आहे. किराणा मालाच्या वस्तूतही मोठ्या प्रमाणामध्ये दरवाढ झाली आहे. तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य या वस्तू जवळपास २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर खाद्यतेलाचा दरही प्रति लिटर १७० ते २०० रुपये झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता फक्त हॉटेलातच नाही तर घरातील जेवणाचं ताटही आता महाग झाले आहे. या कारणास्तव आता जोपर्यंत ही महागाई आटोक्यात येत नाही तोपर्यंत या महागाईच्या भडीमाराचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागेल यात शंकाच नाही.

हेही वाचा - Vadapav Price Hike : महागाईचा फटका मुंबईच्या वडापावला; खवय्यांना लागणार ठसका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.