ETV Bharat / city

maharashtra political crisis: 1 जुलैला फडणवीस सरकारचा शपथविधी? राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा?

1 जुलैला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis sworn in ceremony ), तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी ( Shinde sworn in ceremony ) पार पडेल. मात्र त्यांच्या सोबत अजून आठ ते दहा मंत्री पहिल्यांदा शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.

mantralay
मंत्रालय
author img

By

Published : Jun 30, 2022, 10:12 AM IST

मुंबई - बुधवारी रात्री उशीरा उद्धव ठाकरे राज भवणावर दाखल झाले. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा ( Uddhav Thackeray Resignation ) सादर केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा ( through social media announced resignation ) आपल्या भाषणातून केली होती. त्यांच्या राजीनाम्याची बातमी कळताच भारतीय जनता पक्षामध्ये उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.

  • Maharashtra Assembly Secretary Rajendra Bhagwat informs all state MLAs that as per Governor's orders, there's no need for a floor test now, so today's special session will not be convened

    Uddhav Thackeray announced his resignation as Maharashtra CM & from his MLC post, yesterday

    — ANI (@ANI) June 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एक तारखेला दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता - 1 जुलैला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis sworn in ceremony ), तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी ( Shinde sworn in ceremony ) पार पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्यासोबत अजून आठ ते दहा मंत्री पहिल्यांदा शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. भारतीय जनता पक्षाकडून पाच ते सहा मंत्री, तर एकनाथ शिंदेच्या गटाकडून चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अद्याप दोन्ही गटामध्ये खातेवाटपाबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट ( Floor test ) संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. आणि उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निर्णय दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडिया वरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले की, मला समाधान आहे आम्ही औरंगाबादचे अधिकृतपणे संभाजीनगर ( Aurangabad rename as Sambhajinagar ) आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण ( Osmanabad rename as Dharashiv ) केले आहे. जी बाळासाहेब ठाकरे यांनी नावे दिलेली शहरे आहेत. असे म्हणत त्यांनी मी तुमच्यासमोर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. जनते समोर येऊन त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केल्या नंतर राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ झाला. भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला गेला. राज्यभरात या घटनेबाबत उत्सुकता होती. त्या नंतर सगळ्यांच्या प्रतीक्रीया येत असताना रात्री उशीरा उद्धव ठाकरे हे राजभवणावर पोचले त्यांनी अवघ्या काही मिनीटांची राज्यपालांची भेट घेतली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. आता राज्यात पुढे काय होणार याबद्दल तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा -Maharashtra Gov Formation 2022 : भाजपचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, किरीट सोमैय्या यांचे सूचक ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.