ETV Bharat / city

कोरोनामुळे भविष्यात आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याचा धडा - महापौर - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बातमी

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी, मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jan 26, 2021, 3:39 PM IST

मुंबई - मागील वर्ष कोरोना विषाणूशी लढा देण्यात गेले. आजही कोरोनाशी आरोग्य यंत्रणा आणि मुंबईकर संघर्ष करीत आहेत. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. कोरोनामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेला भविष्याच्या दृष्टीने किती सक्षम व्हावे लागेल, याबाबत चांगलाच धडा मिळाला आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी, मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या.

आरोग्य सेवांचे अद्ययावतीकरण -

यावेळी बोलताना मुंबईत कोरोनामुळे सर्वानाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाशी संघर्ष करताना मुंबई महापालिकेला भविष्यातील आजारांच्या संकटांची जाणीव झाली असून महापालिका आपल्या आरोग्य सेवांचे अधिक उत्तमरित्या अद्ययावतीकरण करीत आहे. कांजूरमार्ग येथील महानगरपालिका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर कोरोनाची लस साठविण्यासाठी शीतगृह उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजनांवर भर देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य सरकारही अहोरात्र मेहनत घेत असल्याचे महापौर म्हणाल्या.

प्रजासत्ताक दिन लोकशाहीचा उत्सव -

२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाने प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा स्वीकार केला. भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व प्रजासत्ताक देश असून आपल्या भारत देशाने त्रिस्तरीय लोकशाही पद्धत स्वीकारली आहे. समाजाच्या तळापर्यंत लोकशाही व्यवस्था झिरपावी ह्या हेतूने ७३ वी आणि ७४ वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि सदर दुरुस्तीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेमध्ये प्रभाग समित्यांची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचा कारभार गतीमान आणि लोकाभिमुख झाला. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी हा कालावधी 'लोकशाही पंधरवडा' म्हणून साजरा करण्याबाबत, राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा 'लोकशाहीचा उत्सव' आहे. विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे, असे महापौरांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांना श्रद्धांजली -

'कोविड-१९' शी लढा देताना अनेक नागरिकांना तसेच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाची तमा न बाळगता संघर्ष करावा लागला. अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे दुःख व्यक्त करीत महापौरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पित केली.

मुंबईकरांनी भीती न बाळगता लस घ्यावी -

कोविड-१९ ह्या आजारावरील 'कोविशिल्ड' ही लस मुंबईमध्ये उपलब्ध झाली असून मुंबई महापालिकेतर्फे पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी भीती आणि चिंता न बाळगता टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. मात्र, लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपलेली नसून त्यानंतरही नागरिकांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात धुणे ही त्रिसुत्री अंगिकारणे अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या वर्षी मालमत्ता करवाढ नाही -

यावर्षी एकूण मालमत्ता करामध्ये ४० टक्के इतकी वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर करदात्या नागरिकांवर अधिक आर्थिक बोजा पडू नये म्हणून यंदा मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ न करता, मागील वर्षीप्रमाणेच मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. तसेच, ५०० चौरस फूट किंवा त्याहून कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांकरिता, महानगरपालिका आकारित असलेल्या मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर १०० टक्के माफ करण्याचे शासन निर्णयानुसार मान्य करण्यात आले आहे, असे महापौरांनी म्हटले.

सायकलींसाठी आठवाड्यातील एक दिवस प्रमुख रस्ता आरक्षित ठेवा -

अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायू प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने ही बाब घातक आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईतील मुख्य रस्ते आठवड्यातून एक दिवस सायकल चालविण्याकरिता आरक्षित ठेवण्यात यावेत व याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन महापौरांनी केले.

पालिका मुख्यालयात पर्यटन -

मुंबई महापालिकेने नागरी आणि सामाजिक दायित्वाबरोबरच ऐतिहासिक वारसाही जपला आहे. सव्वाशे वर्षे पूर्ण झालेली गॉथिक शैलीमध्ये बांधलेली महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक व पुरातन इमारत ही देश-विदेशातील पर्यटकांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. भविष्यात मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन मंडळ यांच्यामधील सामंजस्य करारानुसार ऑनलाईन बुकींग करून ही इमारत दर महिन्यातील साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पाहण्याकरिता उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.

याप्रसंगी, उपमहापौर अ‌ॅड. सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पू्र्वी, भायखळा येथील महापौर निवासस्थानी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.