ETV Bharat / city

'ई टीव्ही भारत'चे वृत्त ठरले खरे! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे केले होते भाकित - महाराष्ट्र कोरोना अपडेट

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची पहिली लाट सरली तेव्हा कोरोना संपलाय, असा समज बऱ्याच लोकांनी करुन घेतला होता. पण अचानक मार्चच्या अखेरीस रुग्णसंख्या वाढायला सुरवात झाली. तेव्हा राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. मराठी प्रसार माध्यमांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या माध्यमाने हे वृत्त प्रकाशित केले होते.

corona
कोरोना संग्रहित फोटो
author img

By

Published : May 19, 2021, 6:52 PM IST

Updated : May 19, 2021, 7:01 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच, ही दुसरी लाट असल्याचे वृत्त सर्वप्रथम 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले होते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आली असून, त्यामुळेच रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती फोर्टीस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे डायरेक्टर आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली होती. लोकसंख्येची घनता, डायबेटीज-हायपरटेन्शनचे रुग्ण, उन्हाचा चटका आणि लोकांचा बेधडकपणा या कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले असून २०२४ पर्यंत कोरोना महाराष्ट्रातून जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.

  • लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर मात

लसीकरणाची गती वाढवण्याची नितांत गरज आहे. लसीकरणानंतर लोकांच्या शरीरात कोरोनाला प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण होईल. या दरम्यान, कोरोना झालेल्या लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडिज विकसित होतील. यातून हर्ड इम्युनिटी गाठता येईल. हर्ड इम्युनिटीच्या बळावर पोलियो, स्मॉलपॉक्स (देवी) सारख्या रोगांवर मात करता आली. असाच विजय कोरोनावर मिळवता येईल, असे डॉ. राहुल पंडित यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले होते.

  • २०२४ पर्यंत कोरोना राहिल सोबत

लसीकरण आणि मास्क हे दोनच कोरोनावर उपाय आहेत. या दोन गोष्टींच्या माध्यमातून आपण कोरोनावर मात करु शकतो. पण सध्याच्या लसीकरणाची गती बघितली तर कोरोनावर मात करता येईल एवढी क्षमता भारतीय लोकसंख्येत विकसित करण्यास वेळ लागेल. त्यानंतरही सुमारे वर्षभर मास्क वापरावा लागेल. माझ्यामते कोरोनाला संपुष्टात आणण्यासाठी सुमारे २०२४ उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला आधीप्रमाणे जगता येईल. तोवर आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल, असे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

यासंदर्भातील सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

Last Updated : May 19, 2021, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.