ठाणे - महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जनसामुदाय उभा राहण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेतून अनेक पदाधिराकी आपले राजीनामे देतायत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नाराजीनाट्य सुरू झाले. त्यानंतर आता ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के ( Former Thane mayor Naresh Mhaske ) यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात पहिला राजीनामा ( first resignation in Thane) आला आहे. नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक ( Naresh Mhaske staunch supporter Eknath Shinde ) मानले जातात.
"गेले अडीचवर्षे शिवसेनेची 'राष्ट्रवादी' गळचेपी ( ncp make trouble Shiv Sena ) करत आले आहे. त्याचा निषेध म्हणून मी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवर पेजवर नरेश म्हस्के यांनी केली आहे. भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा. जात, गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना या आशयाचे पोस्ट करत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आणि आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे."
हेही वाचा - Meeting On Silver Oak : सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई; सिल्वर ओकवर बैठक
एकीकडे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेनेत देखील प्रचंड नाराजी व्यक्त होत असताना, राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या विरोधात विविध माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निदर्शने, मोर्चे काढले जातायत, जोरदार घोषणाबाजी केली जातेय. मात्र दुसरीकडे, बंडखोरीचे नेतृत्व करणाऱ्या नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने ठामे जिल्हाप्रमुख उभे राहत असताना दिसत आहेत. नरेश म्हस्के यांनी शनिवारी रात्री उशिरा आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली आहे.
हेही वाचा - सिल्लोडमध्ये बंडखोर आमदार अब्दुल सत्तार समर्थकांचे शक्तिप्रदर्शन
ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे याच्या विचारातून प्रेरित होऊन शिवसेनचे काम करत आले आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारण सुरू केले. गेली अनेक वर्षे त्यांनी शिवसेनेत एकनिष्ठ राहून पक्षाचे काम केले. पक्षाचे आंदोलने, विविध जबाबदारी तसेच जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी अपार मेहनत घेतली आहे. दरम्यान सद्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांना उघड पाठिंबा दर्शवल्यानंतर आता त्यांनी शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच अशी पोस्ट फेसबुकवर करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा - Rashmi Thackeray in Action : रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात, निवडक आमदारांच्या पत्नीशी संपर्क