ETV Bharat / city

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम १४ महिन्यात होणार पूर्ण - Balasaheb Thackeray National Memorial news

शिवाजी पार्क येथील महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम 14 महिन्यात पूर्ण होणार आहे.

Balasaheb Thackeray National Memorial
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन करताना मुख्यमंत्री
author img

By

Published : Mar 31, 2021, 9:31 PM IST

Updated : Mar 31, 2021, 10:05 PM IST

मुंबई - शिवाजी पार्क येथील महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम 14 महिन्यात पूर्ण होणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ पार पडला.

प्रतिक्रिया देताना मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रोहित पवार

बांधकामापूर्वीच घेतल्या सर्व परवानग्या

बाळासाहेबांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. राज्य सरकारने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली आहे. स्मारकासाठी भू-वापर तसेच पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत.

Balasaheb Thackeray National Memorial
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन

वास्तूचे बांधकाम दोन टप्प्यात

स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगीचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, इत्यादी कामांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा / गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक, इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास केले जाणार आहे. या बांधकामाचा संपूर्ण खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

400 कोटींचा निधी

वारसा स्थळ असलेल्या वास्तुच्या संवर्धनासोबतच नवा संदर्भ लाभलेल्या आणि नव्याने बांधण्यात येणान्या वास्तुरचनेमुळे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे देशाच्या सांस्कृतिक नकाशावरील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण असेल. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. या आराखड्यानुसार येथे बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा - पोलिस शिपाई विनायक शिंदेकडे ठाणे आणि नवी मुंबईची वसूली, गोपनीय डायरी आली समोर

स्मारकात बाळासाहेबांचे जीवनपट

बाळासाहेबांचा जीवनपट, त्यांचे व्यक्तिमत्व , त्यांची विचारसरणी, त्यांची कला, त्यांचे राजकारण आणि त्यांचा सर्वात मोठा वारसा असलेली शिवसेना यांचे समग्र चित्र या स्मारकाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. बाळासाहेब एक कलाकार म्हणून कसे होते, विचारवंत म्हणून कसे होते. लोकनेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणावर बाळासाहेबांचा किती खोलवर ठसा उमटला होता. केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर देशाच्या राजकारणावर बाळासाहेबांचा किती प्रभाव होता आणि मुंबई व महाराष्ट्राच्या विकासामध्ये बाळासाहेबांचे किती अमूल्य योगदान होते . याची प्रचिती या स्मारकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे

बंगला सर्वांसाठी खुला व्हावा, हा दृष्टिकोन

जुन्या महापौर बंगल्यामध्ये पूर्वी मर्यादित व्यक्तींनाच प्रवेश होता. तो बंगला आता सर्वांसाठी खुला व्हावा, हासुद्धा या प्रकल्पामागचा दृष्टिकोन आहे. या ठिकाणच्या हिरवाईचा, मोठमोठ्या वृक्षांच्या सावलीचा, एका बाजूला वनराई तर दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र या मन मोहवून टाकणाऱ्या वातावरणाचा सर्वांनाच आनंद घेता यावा, हे या प्रकल्पाचे व्हिजन आहे.

हेही वाचा - एजाज खानला 3 एप्रिलपर्यंत कोठडी, एजाज म्हणाला- झोपेच्या फक्त ४ गोळ्या सापडल्या

Last Updated : Mar 31, 2021, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.