ETV Bharat / city

ग्रँट रोड परिसरातील इमारतीच्या आगीत जीवितहानी नाही - मुंबई आगीची घटना

अग्निशमन दल येण्यापूर्वी आग विझवण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. विद्युत पुरवठा तोडल्यानंतर बी.ए वापरून बिल्डिंग राइझर सिस्टमच्या प्रथमोपचार नळीच्या साहाय्याने स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मुंबई आग
मुंबई आग
author img

By

Published : May 30, 2020, 7:17 PM IST

मुंबई - शहरातील ग्रँट रोड परिसरात असलेल्या ऑरबीट हाईटस या इमारतीला दुपारी 12च्या सुमारास आग लागली. या इमारतीच्या 26व्या मजल्यावरील फ्लॅट नं. 2603च्या स्वयंपाकघरात आग लागल्याची माहिती आहे. प्राथमिक अंदाजाप्रमाणे वायरिंग, इलेक्ट्रिक साधनांमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अग्निशमन दल येण्यापूर्वी आग विझवण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. विद्युत पुरवठा तोडल्यानंतर बी.ए वापरून बिल्डिंग राइझर सिस्टमच्या प्रथमोपचार नळीच्या साहाय्याने स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. फायर ब्रिगेडचे 2 फायर इंजिन, 2 टँकर आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.