मुंबई - मुंबईतील मानखुर्द मंडाले परिसरातील असलेल्या भंगाराच्या गोदामाला पहाटे आग लागली. या घटनेत 12 हून अधिक गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. 20 हून अधिक अग्निशमन गाड्यानी तब्बल पाच तास आगीशी झुंज देऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
5 तासांनी आगीवर नियंत्रण -
मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर मानखुर्द लिंक रोड वर मानखुर्द मंडाला येथे 3.21 च्या दरम्यान मोठी आग लागली. भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याने आग बाजूला पसरली. आगीची माहिती मिळताच दलाच्या 12 गाड्या याशिवाय 10 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पाठवण्यात आले.आग विझवण्यासाठी सातत्याने पाच तास प्रयत्न सुरू होते. सकाळी 8.31 वाजता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्यानंतर स्थानिकांची गर्दी झाली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी हजर आहेत. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे कारण तपासले जात आहे.
-
#WATCH | Fire breaks out in Mandala scrap market godowns in Mankhurd area of Mumbai
— ANI (@ANI) November 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"We got info about the fire at around 3 am. 12 fire engines, 10 tankers along with 150 firefighters have been deployed for fire fighting operation. No casualty reported," said a fire officer pic.twitter.com/Zaf6KdkIcN
">#WATCH | Fire breaks out in Mandala scrap market godowns in Mankhurd area of Mumbai
— ANI (@ANI) November 12, 2021
"We got info about the fire at around 3 am. 12 fire engines, 10 tankers along with 150 firefighters have been deployed for fire fighting operation. No casualty reported," said a fire officer pic.twitter.com/Zaf6KdkIcN#WATCH | Fire breaks out in Mandala scrap market godowns in Mankhurd area of Mumbai
— ANI (@ANI) November 12, 2021
"We got info about the fire at around 3 am. 12 fire engines, 10 tankers along with 150 firefighters have been deployed for fire fighting operation. No casualty reported," said a fire officer pic.twitter.com/Zaf6KdkIcN