मुंबई - भायखळा आग्रीपाडा येथील साई पॅलेस रेस्टॉरंटला आज रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. आग तुलनेत छोटी म्हणजेच (लेव्हल-1) ची असल्याने आग नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
मुंबईच्या भायखळा आग्रीपाडा जेकब सर्कल येथे साई पॅलेस रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी रात्री 9 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. तळ अधिक एक मजली बांधकामाच्या छप्पराला आग लागली आहे. आग छोटी म्हणजेच लेव्हल 1 ची असल्याने आग नियंत्रण असल्याची आणि सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.