मुंबई - साकी विहार रोडवर 'लार्सन अँड टुबरो' कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे. या घटनेमुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आगीमुळे आणि नागरिकांच्या (बघ्यांच्या) प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो आहे.
मुंबईच्या महापौर थोड्याच वेळात घटनास्थळी -
पवई येथील साकी विहार रोड, एल अँड टी कंपनीच्या गेट क्रमांक 6 जवळ हुंडाई कंपनीचे शोरूम आहे. या शोरूमला सकाळी 11 च्या सुमारास आग लागली. ही आग लेव्हल 1 ची म्हणजेच छोटी आग आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 5 फायर इंजिन आणि 4 वॉटर टॅंक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान या घटनास्थळाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर थोड्याच वेळात भेट देणार आहेत.
हेही वाचा - अखेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; बुलडाण्यातील कर्मचारी संतप्त