ETV Bharat / city

Fir Against Sundar Pichai : गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंविरोधात मुंबईत एफआयआर दाखल - Sundar Pichai

गुगलचे सीईओ पिचाई ( Fir Against Sundar Pichai ) यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.

Fir Against Sundar Pichai
गुगलचे सीईओ
author img

By

Published : Jan 26, 2022, 5:24 PM IST

Updated : Jan 26, 2022, 6:07 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांनी पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी गुगलचे सीईओ पिचाई ( Fir Against Sundar Pichai ) यांच्याविरोधात न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल झाला आहे. कॉपी राईटच्या (Copy Right Act) कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सुंदर पिचाई आणि आणखी 5 जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Fir Filed Against Google Ceo Sundar Pichai In Mumbai
सुंदर पिचाईंविरोधात मुंबईत एफआयआर

काय आहे प्रकरण?

मुंबईत निर्माता आणि दिग्दर्शक सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सुनील दर्शनचा शेवटचा चित्रपट 'एक हसीना थी एक दीवाना था' हा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाई यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.

  • On directions of a court, Mumbai Police books Google CEO Sundar Pichai &5 other company officials for Copyright Act violation

    Film director Suneel Darshan in his complaint said that Google allowed unauthorized persons to upload his film 'Ek Haseena Thi Ek Deewana Tha' on YouTube pic.twitter.com/97fn0ft33p

    — ANI (@ANI) January 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हटलंय तक्रारदारानं?
आपण एक हसीना थी एक दिवाना था चित्रपटाचे कॉपीराइट कोणालाही दिलेले नाहीत. असं असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडीओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत असं सुनील दर्शन यांनी तक्रारीत सांगितलं आहे. चित्रपटाची गाणी आणि व्हिडीओ अपलोड होत असतानाच यूट्यूब आणि गुगलनेही अपलोड करण्याची परवानगी दिली. यामुळे त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि आपलं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं ते म्हणालेत. तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारे सुंदर पिचाई यांच्याव्यतिरिक्त गौतम आनंद यूट्यूबचे एमडी यांच्यासह इतर Googleच्या अधिकार्‍यांवर कॉपीराइट कलम 51, 63 आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Tableau of Maharashtra on Rajpath : राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्रातील जैवविविधतेचे दर्शन; रथ दिसताच गडकरींचे स्मितहास्य, पाहा VIDEO

Last Updated : Jan 26, 2022, 6:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.