ETV Bharat / city

आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या विरोधात ठाण्यातही गुन्हा दाखल, अडचणी वाढणार

धमकवल्याच्या प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jul 23, 2021, 11:06 AM IST

Updated : Jul 23, 2021, 1:03 PM IST

परमबीर सिंह यांच्या विरोधात ठाण्यातही गुन्हा

ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्यातही त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. धमकावणे आणि खंडणी प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल-

मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यावर एका बांधकाम व्यावसायिकाने १५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात देखील परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला आहे. परमबीरसिंह यांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि बळजबरीने जमीन नावावर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. त्या आरोपानुसार भादंवि ३८४, ३८५,३८८,३८९,४२०,३६४ अ, ३४ १२० ब यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंग यांच्यासह संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे असे सह आरोपीविरोधात ही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्यात आज गुन्हा दाखल होण्यापूर्वी गुरुवारी देखील मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपातून मुक्त करून देण्याच्या मोबदल्यात खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासहित सात जणांविरुध्द मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील एक आरोपी हा शिवसेना आमदार गीता जैन यांचा सख्खा भाऊ आहे.

मीरा भाईंदर शहरातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार त्याच्यावर असलेल्या आरोपातून मुक्त करण्याकरिता माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी १५ कोटीची मागणी केली होती. त्यानुसार मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावे आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा हप्ता वसुली करायला लावल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. त्यांच्याच विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अकोल्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकानेही परमबीर सिंह यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

परमबीर यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप-

अँटिलिया येथील स्फोटक प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली होती. यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप लावले होते. याप्रकरणी सीबीआयने चौकशी दरम्यान अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले. सध्या त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

परमबीर यांच्यावर आत्तापर्यंत ५ गुन्हे दाखल

अनिल देशमुख आणि सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे परमबीर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील होत आहेत. परमबीर यांच्यावर याआधी पोलीस खात्यातील ३ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत गुन्हे दाखल आहे तर परमबीर यांची अनेक प्रकरणात चौकशी देखील सुरु आहे

Last Updated : Jul 23, 2021, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.