ETV Bharat / city

राज्यातील लोक कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - package announced for folk artists

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 56 हजार लोक कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी हे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले.

उद्धव ठाकरे ताज्या बातम्या
राज्यातील लोक कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Aug 5, 2021, 10:30 PM IST

मुंबई - कोविडमुळे अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. यामध्ये राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांचाही समावेश आहे. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 56 हजार लोक कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी हे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले.

56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत -

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8 हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहे.

निर्मात्यांसाठी विशेष कोविड पॅकेज -

राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोरोनामुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे आहे. शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिकमंत्री देशमुख यांनी सांगितले. या बैठकीदरम्यान सांस्कृतिक कार्य विभागाचे सादरीकरणही करण्यात आले.

हेही वाचा - लोकल सुरू करण्याचा निर्णय जबाबदारीचे भान राखूनच- मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.