ETV Bharat / city

हल्लेखोर बिबट्या मोकाटच, आरे कॉलनीतून पिल्लाला पकडले - Leopards in Goregaon

मुंबई - गेल्या तीन ते चार दिवसांपासून गोरेगाव आरे कॉलनीमध्ये धुमाकुळ घातलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेल वन विभागाला यश आले आहे. येथे 15 दिवसांत 7 वेळा बिबट्याने वेगवेळ्या व्यक्तींवर हल्ले केले होते. दरम्यान, फिल्म सिटी परिसरामध्ये वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले आहे.

अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

author img

By

Published : Oct 1, 2021, 11:02 AM IST

Updated : Oct 1, 2021, 12:45 PM IST

मुंबई - गेल्या तीन ते चार दिवसांपासून गोरेगाव आरे कॉलनीमध्ये धुमाकुळ घातलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेल वन विभागाला यश आले आहे. येथे 15 दिवसांत 7 वेळा बिबट्याने वेगवेळ्या व्यक्तींवर हल्ले केले होते. दरम्यान, फिल्म सिटी परिसरामध्ये वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले आहे.

हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ

नुकताच येथील आरे कॉलनीत बिबट्याने एका वयस्कर आजींवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. सुदैवाने या आजी बिबट्याच्या तावडीतून सुखरूप बचावल्या आहेत. या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक आजी काठीचा आधार घेत घराच्या अंगणामध्ये आल्या आहेत. थोड्यावेळाने त्या अंगणातील पायरीवर बसतात. आपल्या पाठीमागे बिबट्या बसला असेल याची भनक देखील त्यांना नसते. या वृद्ध आजींना काही समजण्यापूर्वीच बिबट्या त्यांच्यावर हल्ला करतो.

वयस्कर आजींवर हल्ला केला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला व्हिडीओ

नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण

आजी काठीने बिबट्याचा हल्ला रोखण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्या जमिनीवर कोसळतात. परंतु, तरी देखील आजी काठीने बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न करतात. वृद्ध आजींनी केलेला प्रतिकार पाहून काही वेळाने बिबट्या तिथून पळ काढतो. दरम्यान, रोज कुणावरतरी बिबट्या हल्ला करत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. तसेच, नागरिक संतापलेही आहेत. बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली होती.

माहिती देताना परिसरातील महिला

परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी बिबट्याचे पिल्लू आढळून आले.

येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिकांना बिबट्याचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर, वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दगडाच्या मागे बसलेले पिल्लू ओरडत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या मुलांना त्याचा आवाज आला. त्यानंतर तिथे बिबट्याचे पिल्लु असल्याचे समोर आले होते. हे पिल्लू साधा ते चार महिन्यांचे असून त्याला त्याच्या आईटी भेट घालून देण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

Last Updated : Oct 1, 2021, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.