मुंबई - भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईतील मलबार हिल पोलीस ( Cm thackeray compliant malabar hill police station ) स्टेशनमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन ( covid guideline Cm thackeray ) केल्याबद्दल ऑनलाईन तक्रार ( Complaint against Cm Thackeray in Mumbai ) काल दाखल केली आहे. उद्धव ठाकरे हे कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे काही नेत्यांशी त्यांची बैठक होऊ शकलेली नव्हती. अशा परिस्थितीत काल संध्याकाळी मुख्यमंत्री काही व्यक्तींना भेटले. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोरोना गाइडलाइनचे पालन केले नाही, अशी तक्रार आहे. या संदर्भात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : 'तशी परिस्थिती आल्यास विरोधात बसायला तयार', अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री ठाकरे यांची कोरोना अॅन्टिजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील ऑनलाईन हजेरी लावली होती. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली. ती टेस्ट निगेटिव्ह आल्याने संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सायंकाळी पाच नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर वर्षा निवासस्थान सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मलबार हिल येथील वर्षा निवासस्थानी जमले होते.
भाजपचे दिल्लीतील युवा नेते यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दिली आहे. आता यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करूनही शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) माघारी येण्यास तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतेवेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांना याबाबत आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये पूर्वीच सूचना दिली होती.
शिवसैनिक भावूक - सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचे प्रेम पाहून गलबलून गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. त्यांनी शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली आणि गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.
शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणा - मुख्यमंत्री रात्री साडे नऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी उपस्थिती होती. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. शिवसैनिकांचे प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आले.