ETV Bharat / city

मुंबईत गणेशोत्सवादरम्यान जमलेल्या २ लाख ६५ हजार किलो निर्माल्यापासून खतनिर्मिती - Ganeshotsav

गणेशोत्सवादरम्यान २४६ विसर्जन स्थळी १ लाख ६४ हजार ७६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या दरम्यान संकलित करण्यात आलेल्या २ लाख ६५ हजार ९८९ किलो निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Fertilizer production from 2 lakh 65 thousand kg Nirmalya collected during Ganeshotsav in mumbai
गणेशोत्सवादरम्यान जमलेल्या २ लाख ६५ हजार किलो निर्माल्यापासून खतनिर्मिती
author img

By

Published : Sep 21, 2021, 3:58 AM IST

मुंबई - शहरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये राहून नागरिकांनी उत्सव साजरा केला. पालिकेला मुंबईकारांनी चांगली साथ दिल्याने महापौर व पालिका आयुक्तांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. गणेशोत्सवादरम्यान २४६ विसर्जन स्थळी १ लाख ६४ हजार ७६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या दरम्यान संकलित करण्यात आलेल्या २ लाख ६५ हजार ९८९ किलो निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईकरांचे आभार -

कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्रीगणेशोत्सव हा उत्सवाचे पावित्र्य जपत शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाला आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, बृहन्मुंबई व मुंबई उपनगरे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, सर्व संबंधीत संस्था आणि मुंबईकर नागरिकांचे महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आभार मानले आहेत.

१ लाख ५८ हजार मूर्त्यांचे विसर्जन -

यंदाच्‍या श्री गणेशोत्‍सवात संपूर्ण मुंबईतील ७३ नैसर्गिक स्‍थळे आणि १७३ कृत्रिम तलावांमध्ये सुमारे १ लाख ५८ हजार २२९ श्री गणेशमूर्तींचे व ६ हजार ५३२ गौरी मूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले आहे. यानुसार एकूण १ लाख ६४ हजार ७६१ मुर्त्यांचे विसर्जन श्रीगणेशोत्सव काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापैकी ७९ हजार १२९ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्‍ये करण्‍यात आले आहे. तर उर्वरित ८५ हजार ६३२ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक विसर्जन स्थळी करण्यात आले आहे. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या ७९ हजार १२९ मुर्त्यांपैकी ७५ हजार ६८७ या घरगुती स्तरावरील मूर्ती होत्या. तर उर्वरित ३ हजार ५०२ गणेशमूर्ती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या. कृत्रिम विसर्जन स्थळी मुर्त्यांचे विसर्जन करण्यास मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

नैसर्गिक स्थळी विसर्जन -

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये ८५ हजार ६३२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ८२ हजार ३३९ एवढ्या गणेशमूर्ती होत्या, तर ३ हजार २९३ एवढ्या हरतालिका, गौरी मूर्ती होत्या. नैसर्गिक स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या ८२ हजार ३३९ गणेशमूर्तीपैकी ७७ हजार ८१४ या घरगुती गणेशमूर्ती होत्या, तर ४ हजार ५२५ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती होत्या.

हेही वाचा - वर्सोवा समुद्रात बुडालेल्या ५ पैकी २ मुलांचा मृत्यू, एकजण अद्यापही बेपत्ता

निर्माल्य संकलन व खतनिर्मिती -

मूर्ती संकलन व विसर्जनानंतर, महानगरपालिकेकडून १० ते १९ सप्टेंबर या कालावधी दरम्यान एकूण २ लाख ६५ हजार २७९ किलोग्रॅम इतके निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६० हजार ९०० किलो इतके निर्माल्य हे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी अर्थात १४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या संकलित करण्यात आलेल्या विविध ३८ ठिकाणी या निर्माल्‍यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्‍यात आली आहे व करण्यात येत आहे. यानुसार बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा, फुले, हार इत्यादींच्या निर्माल्यापासून तयार करण्यात येणाऱ्या खताचा उपयोग हा प्रामुख्याने महापालिकेच्या उद्यानांमध्ये करण्यात येणार आहे.

हेही वाचा - मुंबईत पहाटे ६ वाजेपर्यंत ३४,४५२ गणेश मूर्तींचे विसर्जन, ५ मुले समुद्रात बुडाली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.