ETV Bharat / city

रिया चक्रवर्तीने माझ्या मुलाला विष दिलंय, सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक आरोप - sushantsingh father news

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर खळबळजनक आरोप केला आहे. माध्यमांना दिलेल्या माहितीत त्यांनी रिया सुशांतला अनेक दिवसांपासून विष देत होती, असे म्हटले आहे. त्यांनी रियाला सुशांतच्या मृत्यूस जबाबदार धरले असून तिला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

sushantisingh rajput suicide
'रिया चक्रवर्तीने माझ्या मुलाला विष दिलंय', सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक आरोप
author img

By

Published : Aug 27, 2020, 10:04 AM IST

Updated : Aug 27, 2020, 12:56 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर खळबळजनक आरोप केला आहे. माध्यमांना दिलेल्या माहितीत त्यांनी रिया सुशांतला अनेक दिवसांपासून विष देत होती, असे म्हटले आहे. त्यांनी रियाला सुशांतच्या मृत्यूस जबाबदार धरले असून तिला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

सुशांतसिंहचे वडील केके सिंह यांनी माध्यमांसमोर जाहीर आरोप करत रिया चक्रवर्तीला 'खूनी' असे संबोधले आहे. रिया चक्रवर्तीनेच माझ्या मुलाची हत्या केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या हत्येमागे तिचा हात असल्याचे वारंवार सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी देखील सांगितले आहे. यानंतर पुन्हा प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. केके सिंह यांनी व्हिडिओमध्ये रिया चक्रवर्तीवर हत्येचा आरोप करत ती सुशांतला विष देत असल्याचे सांगितले. यामुळे पुन्हा चर्चेला खतपाणी मिळाले आहे.

संबंधित व्हिडिओ क्लिपमध्ये सुशांतच्या वडिलांनी तपास यंत्रणांना रिया चक्रवर्तीला अटक करण्याची मागणी केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्तीचे ड्रग डिलरसोबत संबंध असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तिच्या विरोधात तक्रार नोंदवली. यानंतर लगेचच सुशांतच्या वडिलांचा हा व्हिडिओ बाहेर आला आहे.

Last Updated : Aug 27, 2020, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.