ETV Bharat / city

Father Killed Child : तीन बायकोच्या दादल्याने दोन चिमुकल्यांचा खून करुन व्हिडिओ पाठवला पत्नीला, प. बंगालमधून पळाला मुंबईत अन् माग . . . - अपडेट क्राईम न्यूज

मुर्शिदाबादमध्ये आपल्या दोन मुलांचा खून केला होती. खून केल्यानंतर तिथून पळ काढून तो मुंबईत लपला होता. दोन्ही मुलांचा खून केल्यानंतर आरोपीने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत दुसऱ्या पत्नीला पाठवला होता. मुंबई पोलिसांनी या घ नेतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Father killing his two children in West Bengal
आरोपीसह मुंबई पोलिसांचे पथक
author img

By

Published : Jun 6, 2022, 2:03 PM IST

मुंबई - दोन मुलांचा खून करुन त्याचा व्हिडिओ पत्नीला पाठवणाऱ्या आरोपीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही धक्कादायक घटना प. बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये 26 मे रोजी घडली होती. खुदाबक्ष इमरान शेख (30) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खून केल्यानंतर खुदाबक्ष हा मुंबईत पळून आला होता. रविवारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांडवर पाठवले आहे.

गळा आवळून मुलगा आणि मुलीचा केला खून - खुदाबक्षने 26 मे रोजी मुर्शिदाबादमध्ये आपल्या दोन मुलांचा खून केला होती. खून केल्यानंतर तिथून पळ काढून तो मुंबईत लपला होता. दोन्ही मुलांचा खून केल्यानंतर आरोपीने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत दुसऱ्या पत्नीला पाठवला होता. पत्नीच्या तक्रारीनंतर खुदाबक्षवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

तिसरे लग्न केल्याने दुसऱ्या पत्नीसोबत झाला वाद - खुदाबक्ष (30) हा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने अल्पवयीन असताना लग्न केले. त्याला 10 वर्षांचा मुलगा अलीम आणि 12 वर्षांची मुलगी रिना अशी दोन अपत्ये आहेत. खुदाबक्षने तीन लग्ने केली. या दोन अपत्यांची आई आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा ठावठिकाणा माहीत नाही. आरोपी दुसरी पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. त्याने नुकतेच तिसरे लग्न केले. यावरुन त्याची दुसरी पत्नी आणि त्याच्यामध्ये वारंवार भांडणे होत होते. यामध्ये दोन्ही मुलंही भरडली जात होती. आरोपी पत्नीला मारहाण करुन तिचा छळ करायचा. नेहमीच्या भांडणामुळे खुदाबक्ष शेख वैतागला होता. 26 मे रोजी पुन्हा भांडण झाल्यावर त्याने रागाच्या भरात मुलांचा गळा आवळून त्यांचा खून केला अशी माहिती युनिट 7 चे पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांनी दिली.

खून करुन पळाला मुंबईत - तपासादरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांना आरोपी मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक 2 जून रोजी मुंबईत आले. मुंबई गुन्हे शाखा युनिट 7 ने चौकशी सुरु केली. आरोपीचे ठिकाण शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम यांनी तांत्रिक विश्लेषण केले. तो मुलुंडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळली. त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांच्या पथकासोबत जाऊन त्याला अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शेखला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आले. पश्चिम बंगाल पोलीस आता शेखला पुढील तपासासाठी त्याच्या मूळगावी घेऊन जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.