ETV Bharat / city

फास्टॅगविना सी-लिंकवरून प्रवास करणाऱ्याकडून मागील दोन दिवसांत 48 हजार 370 रुपयांची टोलवसुली

विना फास्टॅग सी-लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसुली केली जात आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांत 691 वाहनचालकांकडून 48 हजार 370 रुपये इतका टोल वसूल केला आहे. फास्टॅग लागू होऊन 10 दिवस होत आले तरी अजूनही वाहनचालक फास्टॅग लावून घेत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Feb 4, 2021, 10:25 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) ने 26 जानेवारीपासून वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार विना फास्टॅग सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसुली केली जात आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांत 691 वाहनचालकांकडून 48 हजार 370 रुपये इतका टोल वसूल केला आहे. फास्टॅग लागू होऊन 10 दिवस होत आले तरी अजूनही वाहनचालक फास्टॅग लावून घेत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

पुढच्या महिन्यात 5 एन्ट्री पॉईंटवर फास्टॅग

टोलनाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली स्वीकारण्यात आली आहे. त्यानुसार देशभरात आता ही प्रणाली 100 टक्के अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या वाहनांना फास्टॅग स्टिकर नसेल त्यांना दुप्पट टोल लावण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात पहिल्या टप्प्यात सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 26 जानेवारीपासून फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू केली आहे. फास्टॅग ही नवीन प्रणाली असून याबाबत म्हणावी तशी जनजागृती अजून झालेली नाही. त्यामुळे सी लिंकवर काही मार्गिका हायब्रीड म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच या मार्गिकेवरून विना फास्टॅग वाहनांना रोख रक्कम भरत जाता येते. पण त्यानंतर मात्र फास्टॅग खरेदी करावे लागते. मात्र त्याचवेळी हायब्रीड मार्गाऐवजी 100 टक्के फास्टॅग असलेल्या मार्गिकेवरून प्रवास केल्यास दुप्पट टोल वसूल केला जात आहे. दरम्यान आता हळू हळू संपूर्ण राज्यात फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात मुंबईतील पाच ही एन्ट्री पॉइंट (वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका आणि एलबीएस ) वर महिन्याभरात 100 टक्के फास्टॅगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

2 आणि 3 फेब्रुवारीला सी लिंकवर 691वाहनाची विनाफास्टॅग सफर

26 जानेवारीपासून सी लिंकवर 100 टक्के फास्टॅग लागू करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती करत विविध ठिकाणी फास्टॅग उपलब्ध करून दिले जात असून फास्टॅगमध्ये 5 टक्के कॅशबॅक ही देण्यात आले आहे. मात्र अजूनही सी लिंक वरून मोठ्या संख्येने विना फास्टॅग प्रवास केला जात असून असा प्रवास करणे त्यांना महाग पडत आहे. कारण 2 आणि 3 जानेवारीला 691 वाहनांनी विनाफास्टॅग प्रवास केला असून त्यांना दुप्पट टोल आकारण्यात आला आहे.

2 फेब्रुवारीला

F04 मार्गिकेवरून 28 वाहने
F05 वरून 26 वाहने
F06 वरून 61 वाहने
F011 वरून 33 वाहने
F012 वरून 39 वाहने
F013 वरून 59 वाहने, अशी एकूण 246 वाहने विना फास्टॅग गेल्या आहेत. तर त्यांच्याकडून 17 हजार 220 इतकी रक्कम दुप्पट टोल आकारत वसूल केली आहे, अशी माहिती कमलाकर फंड, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांनी दिली आहे.

3 फेब्रुवारीला
I मार्गिकेवरून 262 वाहने,
II मार्गिकेवरून 72 वाहने,
III मार्गिकेवरून 11 वाहने अशी एकूण 445 वाहने विना फास्टॅग गेली आहेत. तर या वाहनांकडून एकूण 31 हजार 150 रुपये इतकी रक्कम वसूूल केली आहे असेही त्यांनी सांगितले आहे. तर आता सर्व वाहनचालकांनी वफास्टॅग लावून घ्यावेत असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.