मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी ( Famous Industrialist Mukesh Ambani ) यांचे सुपुत्र उद्योगपती अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट ( Anant Ambani Met CM Eknath Shinde ) घेतली. शनिवारी रात्री उशिरा अनंत अंबानी (Anant Ambani) हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ( Anant Ambani Reached Varsha Bungalow ) त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीमागचं कारण नेमकं काय होतं, हे कळू शकलेलं नाही. मात्र, अंबानी-शिंदे भेटीमुळे आता तर्क-वितर्क लढवले जात ( CM Eknath Shinde Discussed with Anant Ambani ) आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतली होती रतन टाटा यांची भेट : काही आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि रतन टाटा भेटदेखील झाली होती. उद्योगपतींसोबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. दरम्यान, अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळी झालेल्या चर्चा गुलदस्त्यात आहे. जुलै महिन्यात एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्यात भेट झाली होती.
उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट : दुसरीकडे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अदानी आणि ठाकरे भेटीला अवघे काही दिवस उलटले आहेत. त्यानंतर आता शनिवारी शिंदे-अंबानी यांच्यात झालेली भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जातेय.
भेटीचं कारण काय : अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या भेटीदरम्यान, शिंदे-अंबानी यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आगामी प्रकल्पांबाबत राज्य सरकारचं सहकार्य मिळावं, यासाठी ही भेट झालेली असू शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय.
राजकीय घडामोडीमध्ये ही भेट महत्त्वाची : वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरवला गेला असल्याची टीका केली जात होती. यानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे भेट ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जातेय.