ETV Bharat / city

Face To Face Ashish Shelar मुंबईतील शिवसेनेची एकाधिकारशाही संपवणार, आशिष शेलारांचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा मुंबईत खांदेपालक केली आहे. आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे परिवारांची ही मक्तेदारी येत्या निवडणुकीत मोडून काढणार आणि मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार, असा दावा आशिष शेलारांनी केला Ashish Shelar criticized thackeray over mumbai corporation election 2022 आहे.

Ashish Shelar
Ashish Shelar
author img

By

Published : Aug 20, 2022, 6:33 AM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेचे राज्य आहे. शिवसेनेने मुंबईकरांना वेठीस धरले असून, भ्रष्ट कारभाराची एकाधिकारशाही येत्या निवडणुकीत संपवणार, असा दावा भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार mumbai bjp chief Ashish Shelar यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा मुंबईत खांदेपालक केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देत पुन्हा एकदा निवडणुकांचे मैदान गाजवण्यासाठी आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली Ashish Shelar criticized thackeray over mumbai corporation election 2022 आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

'मुंबईतील एका परिवाराची मक्तेदारी संपवणार' - आशिष म्हणाले की, मुंबईत गेल्या पंचवीस वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ठाकरे परिवारांची ही मक्तेदारी येत्या निवडणुकीत मोडून काढणार आणि मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार, असा ठाम विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.

'मराठी माणसाच्या नावाने राजकारण' - शिवसेनेने आतापर्यंत मुंबईत मराठी माणसाच्या नावाने केवळ राजकारण केलं. शिवसेनेलाच मुंबईत मराठी माणसाचा पाठिंबा मिळतो, हा भ्रम तयार केला आहे. मात्र, हा भ्रम यावेळेस निश्चितच दूर होईल आणि मराठी माणूस हा अन्य पक्षांनाही तितक्याच मोठ्या प्रमाणात मतदान करतो. विशेषता यावेळेस तो भाजपवर विश्वास दाखवेल. शिवसेनेने मुंबईकरांची फसवणूक केली आहे. केवळ नावाला मराठी माणूस म्हटले जाते. पण, मुंबईतील सर्व कंत्राटदार हे अमराठी आहेत. मुंबईत केवळ भ्रष्टाचाराची गंगोत्री निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. मुंबईतली रस्ते आणि पाणी व्यवस्था या सर्व अतिशय खराब अवस्थेत आहे. मुंबईकरांना विकासाची नवी वाट भाजप दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही आशिष शेलारांनी सांगितलं आहे.

'मुंबईकरांना मेट्रो हवी' - आरे कारशेडबाबात बोलताना शेलार यांनी म्हटलं की, मुंबईकरांना मेट्रो हवी आहे. मेट्रोच्या बाजूने मुंबईकर उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कारशेडला विरोध नाही. हा शिवसेनेने पसरवलेला भ्रम आहे. मुंबईकर हा विकासाच्याच बाजूने उभा आहे.

'युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील' - आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा मोठ्या ताकदीने उतरते आहे. मात्र, यावेळेस शिंदे गटासोबत युती करायची की नाही आणि कशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. आम्ही फक्त निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने काम करणार आहोत. या वेळेस नक्कीच त्यात विजयी होऊ, असा दावाही आशिष शेलरांनी केला आहे.

'राज्यपालांच्या विधानाचा फटका नाही' - मुंबईबाबत अनेक भ्रम पसरवले जात आहेत. मुंबईतील व्यापार उद्योग मुंबईच्या बाहेर घेऊन जात असल्याचे बतावणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, त्यात सत्य नाही. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबईकरांबाबत केलेल्या विधानाचा कोणताही फटका आता बसणार नाही. कारण त्या संदर्भात स्वतः राज्यपालांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी स्वतःही सर्वात आधी त्याबाबत भूमिका मांडली होती. त्यामुळे तो आता विषय संपला आहे. आता केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच आम्ही कंबर कसली असून, टप्प्याटप्प्याने प्रयत्न करीत आहोत. त्याला नक्की यश येईल, असा विश्वास आशिष शेलार यांनी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा - Face To Face Tatyarao Lahane : आईने स्वत:ची किडनी देऊन माझा पुर्णजन्म केला; तात्याराव लहानेंनी सांगितली 'ती' भावुक गोष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.