ETV Bharat / city

वाढीव वीजबिल कमी होणार; मनसेच्या शिष्टमंडळाला ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन - मनसे शिष्टमंडळ उर्जामंत्री नितीन राऊत भेट

राज्यात अनेक नागरिकांना अतिरिक्त वीजबिल आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. यावेळी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मनसे शिष्टमंडळाला वाढीव बिलांच्या प्रकरणी लक्ष घालून, योग्य ती कारवाई करत बीजबिल कमी करण्याचे आश्वासन दिले.

Energy Minister Dr. Nitin Raut
उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
author img

By

Published : Jul 2, 2020, 3:20 PM IST

मुंबई - राज्यात अनेक नागरिकांना अतिरिक्त वीजबिल आले असल्याच्या तक्रारी आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. यावेळी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मनसे शिष्टमंडळाला वाढीव बिलांच्या प्रकरणी लक्ष घालून, योग्य ती कारवाई करत बीजबिल कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच जर कंपन्यांनी बिल कमी केले नाही मनसे आपल्या भाषेत उत्तर देईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची ईटीव्ही भारतला विशेष प्रतिक्रिया...

हेही वाचा - नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा राडा, एकास अटक

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले. कोणाचाही वीज पुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन राऊत यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले. ज्यांना अतरिक्त वीजबिल आले आहेत. त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्या सुधारित बिलात किमान 50 टक्के सूट द्यावी, अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. सरकारने सुरू केलेली भाववाढ ही कोरोनाचे संकट संपल्यावर करा, अशी मागणी मनसेने केली आहे.

सध्या सामंजस्याने चर्चा करण्याची वेळ आहे. पण, ज्या खासगी कंपन्या मनमानी कारभार करतील, त्यांना मनसेचा दणका काय असतो ते कळेल. तसेच कोकणातील वादळग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्याबद्दलही आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे उर्जामंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, आमदार प्रमोद (राजू) पाटील, अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) ऊर्जामंत्र्यांना भेटत आपल्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.