ETV Bharat / city

सायन रुग्णालयात आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपीला अटक - सायन रुग्णालय

रुग्णालय परिसरात कचरा वेचणाऱ्या 24 वर्षीय तरुणानेच अतिप्रसंग केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुरज गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. सायन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने मुलीला तुझी आई बोलवत आहे, असे सांगून बोलावून घेतले. चॉकलेटचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

सायन
सायन
author img

By

Published : Nov 9, 2021, 3:31 PM IST

मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयातील इमारतीत चिमुरड्या मुलीसोबत अतिप्रसंग झाल्याचा आरोप केला जात आहे. आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर 6 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याची माहिती आहे. रुग्णालय परिसरात कचरा वेचणाऱ्या 24 वर्षीय तरुणानेच अतिप्रसंग केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुरज गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. सायन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने मुलीला तुझी आई बोलवत आहे, असे सांगून बोलावून घेतले. चॉकलेटचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

रविवारी सायंकाळी सायन रुग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात आरोपी सुरज गायकवाड विरोधात कलम 354 सह 8, 12 पोस्को 2012 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायन रुग्णालयामध्ये कचरा वेचणाऱ्या कामगाराकडून आठ वर्षीय तरुणीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.