मुंबई - म्हाडा ( MHADA Authority Exam ) आणि एमपीएससीच्या परीक्षा ( MPSC Exam ) एकाच दिवशी आल्याने उडालेल्या नियोजनाच्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या ( MHADA Authority Exam Cancelled ) होत्या. म्हाडा प्राधिकरणाने आज परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला ( MHADA Exam Schedule 2022 ) आहे. येत्या 7 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी पर्यंत परीक्षा होतील. म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर ( MHADA Official Website ) संपूर्ण वेळापत्रक विद्यार्थ्यांना पाहता येईल, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
एकत्र तारखांमुळे झाला होता गोंधळ
म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरतीच्या परीक्षांच्या ( Health Department Exam ) तारखा एकत्र जाहीर झाल्याने मोठा घोळ झाला होता. विद्यार्थ्यांकडून देखील याबाबत तक्रारी आल्या. त्यामुळे म्हाडाने त्यांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करू असे यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार आता म्हाडाच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.
असे असेल परीक्षेचे नियोजन
म्हाडाच्या क्लस्टर-6 सहाय्यक,वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखनाची परीक्षा नव्या वेळापत्रकानुसार, दिनांक 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला होणार आहेत. तिन्ही दिवशी सकाळी 9 ते 11:00, दुपारी 12:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 4:00 ते 6:00 या वेळेत परीक्षा होतील.