ETV Bharat / city

Exam Fever 2022 : ...यामुळे राज्यातील सीईटी-एमएचटी परीक्षा पुढे ढकलली - मंत्री उदय सामंत

author img

By

Published : Apr 21, 2022, 8:17 PM IST

राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्याची ( CET Exam Postponed ) माहिती गुरुवारी (दि. 21 एप्रिल) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. याशिवाय सीईटी आणि एमएचटी परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यासंदर्भातील तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत

मुंबई - राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्याची माहिती गुरुवारी (दि. 21 एप्रिल) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. याशिवाय सीईटी आणि एमएचटी परीक्षा ऑगस्ट महन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यासंदर्भातील तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

  • JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल.. तारखा लवकरच जाहीर करू.

    — Uday Samant (@samant_uday) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लवकरच नवीन वेळापत्रक -मागील आठवड्यात जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम ( JEE ) आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट ( NEET ) ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेचा एकाच कालावधीत येणार असल्याने सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. याशिवाय लवकरच सीईटी आणि एमएचटी परीक्षा नवीन वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. तर महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट ( CET ) सेलचे आयुक्त आर.एस. जगताप यांनी सांगितले की, अभियांत्रिकी सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. तर इतर सर्व सीईटी पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

हेही वाचा - MNS Release Bhonga Movie : मनसेचा 'भोंगा' वाजणार; 3 तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.