ETV Bharat / city

Bachu Kadu judicial custody बच्चू कडूंना कोर्टाकडून अंतरिम जामिन मंजूर, पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार

author img

By

Published : Sep 14, 2022, 3:21 PM IST

Updated : Sep 14, 2022, 6:11 PM IST

राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू (bacchu kadu) कडू यांना 2016 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात (assaulting government employees) गिरगाव कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर, त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ( judicial custody ) रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली असून बच्चू कडू यांच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

bacchu kadu
बच्चू कडू

मुंबई सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण (Abusing and beating) केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. 30 मार्च 2016 ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.

मुंबई सत्र न्यायालयाचा बच्चू कडू यांना अंतरिम जामिन मंजूर झाला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज संध्याकाळी बच्चू कडूंची सुटका होणार आहे. मात्र नियमित जामिनावर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे.

बच्चू कडू यांनी या अगोदर देखील अनेकदा उग्र स्वरूपाची अनेक आंदोलन केले होती. त्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल आहेत. प्रहार संघटना ही आंदोलनांकरिता लोकप्रिय आहे. बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित (bhaurao gavit) यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे, असे तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र, आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर, संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

आता पुढे काय होऊ शकतं ? गिरगांव कोर्टाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गिरगाव कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता बच्चू कडू यांचे वकील सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज सादर करतील, अशी माहिती आहे. सेशन कोर्टात बच्चू कडू यांना जामीन मिळू शकतो. अस देखील सांगण्यात आहे.

Last Updated : Sep 14, 2022, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.