मुंबई: गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण १ दिवस सुद्धा ते घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात.अशा आषयाचे ट्विट निलेश राणेनी करत मुख्यमंत्र्यावर निशाना साधला आहे.
आदित्य ठाकरेंची उडवली होती खिल्लीहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधान भवनात जात असताना पायऱ्यांवर आले असता म्याऊ.. म्याऊ.. असा आवाज काढून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता त्यांचे मोठे बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी हे ट्विट करून एक नवीन वाद निर्माण केला आहे. कालच्या नितेश राणे यांनी खिल्ली उडवल्यावर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांना विधान भवन परिसरात अशा पद्धतीची टिंगल टवाळी करणाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे. अशी विनंती केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे.
ठाकरे - राणे वाद पारंपारिकशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व त्यांची शिवसेना ही नेहमीच केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे व आताचे आमदार नितेश राणे यांच्या निशाण्यावर राहिलेले आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसताना अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका टिप्पणी करणे किती योग्य आहे? हा चर्चेचा विषय असला तरी निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.