ETV Bharat / city

Robert Firefighters: पहिला फेल, तरीही आणखी 2 रॉबर्ट अग्निशमन दलात आणले जाणार - मुंबई अग्निशमन दल

Robert Firefighters: मुंबईमध्ये लागणाऱ्या आगी विझवताना अग्निशमन दलातील जवान जखमी होतात. तसेच आग मोठी असल्यास तिचा सामना करणे अनेकवेळा जवानांना शक्य होत नाही. यासाठी मुंबई अग्निशमन दलाने Mumbai Fire Brigade आपल्या ताफ्यात देशातील पहिला रॉबर्ट आणला होता. हा रॉबर्टचा प्रयोग फेल झाला असताना आणखी दोन रॉबर्ट अग्निशमन दलात आणण्याचा घाट घालण्यात आला आहे.

Robert Firefighters
Robert Firefighters
author img

By

Published : Sep 30, 2022, 10:57 PM IST

मुंबई: मुंबईमध्ये लागणाऱ्या आगी विझवताना अग्निशमन दलातील जवान जखमी होतात. तसेच आग मोठी असल्यास तिचा सामना करणे अनेकवेळा जवानांना शक्य होत नाही. यासाठी मुंबई अग्निशमन दलाने Mumbai Fire Brigade आपल्या ताफ्यात देशातील पहिला रॉबर्ट आणला होता. हा रॉबर्टचा प्रयोग फेल झाला असताना आणखी दोन रॉबर्ट अग्निशमन दलात आणण्याचा घाट घालण्यात आला आहे. यावर हे रॉबर्ट आग विझवायला कि भ्रष्टाचार करायला आणले जात आहे, अशी टीका केली जात आहे.

अग्निशमन दलात पहिला रॉबर्ट मुंबई रोज २५ ते ३० आगीच्या घटना घडतात. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जीवाची बाजी लावतात. आगीची तीव्रता जास्त असताना जवान जास्त वेळ आगीशी झुंज देऊ शकत नाहीत. यासाठी आगीच्या ठिकाणी जवळ जाऊन आगीवर पाणी मारणे. आगीच्या ठिकाणचे कॅमेराद्वारे फोटो पाठवणे, अशी कामे करणारा रॉबर्ट अग्निशमन दलामध्ये २०१९- २० मध्ये आणण्यात आला. १ कोटी किमतीच्या या रॉबर्टचे वजन ४०० ते ५०० किलो आहे. रॉबर्टमधील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्ट चित्र दाखवतो. यामध्ये कॅमेरा बसविण्यात आला असल्याने घटनास्थळाचाही अंदाज घेता येतो. विमान बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे ७०० अंश सेल्सिअसच्या तापमानात रोबो स्वत:चे संरक्षण करतो. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा रोबो ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो. ३०० मीटरपर्यंत त्याचे रिमोटद्वारे नियंत्रण करणे शक्य आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

रॉबर्टवर प्रश्नचिन्ह मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात रोबरत आणल्यावर बांद्रा येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागली होती. आग विझवण्यासाठी इमारतीमध्ये रॉबर्ट पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. रॉबर्ट तळ मजल्यावरील पायऱ्यांवरही चढला नव्हता. अग्निशमन दलाच्या जवानांना धक्के मारत रॉबर्ट ढकलावा लागला होता. यामुळे सपाट पृष्ठभाग असल्यावर रॉबर्ट काम करू शकतो, अन्यथा उंच ठिकाणी रॉबर्ट शिड्यांवरून जाऊ शकत नाही. रॉबर्टसाठी खर्च करण्यात आलेला करदात्या नागरिकांचे पैसे फुकट गेल्याचा आरोप महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अग्निशमन दलावर करण्यात आला होता.

आणखी 2 रॉबर्ट आणले जाणार अग्निशमन दलात ८ कोटी रुपये खर्च करून आणखी 2 रॉबर्ट आणले जाणार आहेत. सलग चार तास सामना करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज देणार असून, घटनेच्या ठिकाणचे फोटो पाठवणार आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात दोन रोबोट दाखल होणार आहेत. हे रॉबर्ट पायऱ्यांवर चढून आगीजवळ जाऊन पाणी मारू शकणार आहेत. रिमोट कंट्रोलने ते हाताळता येणार आहेत. आगीच्या तीव्रतेची माहिती अग्निशमन दलाला समजणार असल्याने बचावकार्यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवून त्वरित उपाययोजना करणे, तसेच जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होणार आहे. अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी दिली आहे.

आग विझवायला की भ्रष्टाचार करायला मुंबई अग्निशमन दलात या आधी रॉबर्ट आणला आहे. त्याचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. यामुळे रॉबर्टने काय काम केले, रॉबर्टमुळे किती आगीच्या घटनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले, याचीही माहिती समोर आणली पाहिजे. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत. नव्याने आणले जाणारे रॉबर्ट आग विझवायला आणले जाणार आहे. भ्रष्टाचार आणला जाणार आहे, असा प्रश्न भाजपाचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.