मुंबई - मुंबई पोलीस खात्यात दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणारे पोलीस निरीक्षक जेवियर रॉकी रेगो यांचे 13 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाची बाधा झाल्यामुळे निधन झाले होते. मात्र पोलीस खात्यात राहून तब्बल 700 कुटुंबांना समुपदेशन करणाऱ्या जेवियर रेगो यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा रेगो यांनी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा कामाला सुरुवात करून कोरोना संक्रमण काळात नागरिकांचे सोशल माध्यमांवर समुपदेशन करण्याचे काम करत आहेत. या बरोबरच बोरवली मधील मॅटर्निटी होम मध्ये महिन्याला 15 ते 20 महिलांच्या प्रसूती त्या करत आहेत.
स्वतःला पती ने सुरू केलेल्या समुपदेशनाच्या कार्यात झोकून दिले.
मुंबई पोलीस खात्यात नावाजलेले पोलीस निरीक्षक म्हणून जेवीअर रेगो यांचे नाव घेतले जाते. 1993 च्या एमपीएसी परीक्षेत राज्यात 4 थ्या क्रमांकावर आलेलले जेवीयर हे कोरोना संक्रमण काळात आपले कर्तव्य पार पाडत होते. कोरोना होईल या भितीने ग्रासलेल्या नागरिकांचे समुपदेशन करण्याचे काम हे दोन्ही पती-पत्नी करत होते. मात्र वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या जेवीयर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर, उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जेवीअर यांची पत्नी डॉ. मनिषा रेगो या खचून न जाता, त्यांनी स्वतःला पती ने सुरू केलेल्या समुपदेशनाच्या कार्यात झोकून दिले. सध्या सोशल माध्यमांवर कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून कुठली खबरदारी घ्यावी किंवा कोरोना झाल्यास कुठले उपचार घ्यावे याचे मार्गदर्शन त्या करत आहेत.
शक्य होईल तेवढे समुपदेशनाचे काम
डॉक्टर मनीषा रेगो यांच्या मतानुसार पतीच्या जाण्यामुळे त्यांचा मोठा आधार निघून गेला होता. मात्र यामुळे खचून न जाता आपल्या पतीने सुरू केलेल्या समुपदेशनाचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी केला. सध्या बोरिवलीच्या मॅटर्निटी होम मध्ये डॉक्टर मनीषा या काम करत असून, शक्य होईल तेवढे समुपदेशनाचे काम त्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण संक्रमण काळात गरोदर असलेल्या महिलांनी कुठले उपचार घ्यावे? त्यांनी स्वतःची व बाळाची काळजी कशी घ्यावी? याबद्दल त्या समुपदेशन करत आहेत.
हेही वाचा - बॅन्क्वेट हॉलमधील सिलिंडरमुळे भडकली ड्रिम्स मॉलमधील आग; अहवालातील निष्कर्ष