ETV Bharat / city

ईटीव्ही इम्पॅक्ट : 'त्या' 209 परिचारिकांना मिळणार कायमस्वरुपी नोकरी

author img

By

Published : Jul 30, 2020, 3:27 PM IST

विविध कोविड सेंटरमध्ये कोरोनाविरोधातील लढ्यात काम करत आहेत. त्यांना 50 ते 54 हजार रुपये असे वेतन लागू करण्यात आले. त्यांचे वेतन आणि सेवेतील समस्याबाबतचे सविस्तर वृत्त 'ईटीव्ही भारत' ने 27 जुलैला वृत्त प्रसिद्ध केले होते.

संग्रहित -परिचारिका
संग्रहित -परिचारिका

मुंबई – कोरोनाच्या लढ्यात मुंबई महानगरपालिकेने मे मध्ये 209 परिचारिकांची नियुक्ती केली होती. पण दोन महिने झाले तरी त्यांना वेतन नव्हते. त्यांना नोकरीत कायमस्वरूपी करण्याची प्रक्रियाही सुरू केली नव्हती. त्याबाबत 'ईटीव्ही भारत'ने दिलेल्या वृत्ताची महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. परिचारिकांना वेतनासह कायमस्वरुपी सेवेत घेतले जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी पडू लागले. त्यामुळे पालिकेने बॉम्बे नर्सिंग कॉलेजमधून प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. बिंदूनामावलीचा विचार न करता ही भरती करण्यात आली. त्यानुसार मेमध्ये 209 परिचारिका सेवेत दाखल झाल्या आहेत. त्या विविध कोविड सेंटरमध्ये कोरोनाविरोधातील लढ्यात काम करत आहेत. त्यांना 50 ते 54 हजार रुपये असे वेतन लागू करण्यात आले. त्यांचे वेतन आणि सेवेतील समस्याबाबतचे सविस्तर वृत्त 'ईटीव्ही भारत' ने 27 जुलैला वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पालिकेचे आरोग्य विभाग कामाला लागले. याविषयी अतिरिक्त आयुक्त काकाणी यांच्याकडे 'ईटीव्ही भारत' ने पाठपुरावा केला. याबाबत काकाणी म्हणाले, की या परिचारिकांना कायमस्वरुपी सेवेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतल्यानंतरच त्यांना वेतन देण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालिका कर्मचारी संघटनेकडून समाधान व्यक्त

पालिकेच्या या निर्णयावर म्युन्सिपल मजदूर युनियनने समाधान व्यक्त केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना युनियनचे प्रदीप नारकर म्हणाले, की परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे ही बाब आमच्यासाठी महत्वाची होती. ती आता मार्गी लागणे ही दिलासादायक बाब आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.