आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
फिरोजाबाद येथे किसान युनियची महापंचायत
3 ऑक्टोबर रोजी भारतीय किसान युनियन भानु गट जिल्ह्यात महापंचायत आयोजित करणार आहे. या महापंचायतीमध्ये शेतकऱ्यांशी संबंधित समस्या मांडल्या जातील. विशेष बाब म्हणजे या महापंचायतीमध्ये यूपी सरकारचे उपमुख्यमंत्री डॉ दिनेश शर्माही येणार आहेत. अशी अपेक्षा आहे की या महापंचायतीमध्ये शेतकऱ्यांशी संबंधित काही मुद्द्यांबाबत महत्त्वाची घोषणा होऊ शकते.
फ्लिपकार्डचा बिग बिलियन डेज आजपासून सुरू, तसेच अॅमेझॉन च्या ग्रेट इंडियन फेस्टीवलचीही सुरूवात
IPL सामना
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध पंजाब किंग्ज इलेव्हन पंजाब
कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनराईज हैदराबाद
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुरुडच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमैयांना शिवसेनेच्या रामदास कदमांनीच पुरवली - राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा आरोप
दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैयांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप खेडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
समुद्रात क्रूझवर एनसीबीची कारवाई; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त
मुंबई ते अरेबियन सी, गोवा जाणाऱ्या एका क्रूझमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीत ड्रग्ज आणण्यात आल्याची माहिती एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली. एनसीबीने या क्रूझवर पाळत ठेवत भर समुद्रात छापा मारून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहे. यात काही बॉलिवूड कलाकार व एका कलाकाराचा मुलगा असल्याची माहिती मिळत आहे.
साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार करावा - गडकरी; देश उभारणीत गडकरींचे योगदान - पवार
देशाला 240 लाख टन साखरेची गरज असताना 310 लाख टन साखर उत्पादन होत आहे. गरजेपेक्षा 70 लाख टन साखरेचे उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, बँका डबघाईला येतात आणि साखर कारखानदारी बंद पडण्याच्या परीस्थितीत आहे. हे चक्र थांबवायचे असेल तर आता साखरे ऐवजी इथेनॉल निर्मिती साखर कारखान्यांनी केली तरच शेतकरी आणि साखर कारखाने जगातील असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने मिळणार पीककर्ज - अजित पवार
आगामी काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनेल कसे निवडून आणता येईल. याबाबत तेराही तालुक्यातील प्रमुख एकत्रित बसून चांगल्या प्रकारचा मार्ग काढू. जसे की, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंतचे पिककर्ज होते. ते आता पाच लाखापर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यात शनिवारी 2 हजार 696 नवे रुग्ण, तर 49 रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. आज (शनिवारी) 2 ऑक्टोबरला 2 हजार 696 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 62 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.