ETV Bharat / city

आज एसआयटीकडून आर्यन खानची चौकशी.... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - todays news

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

etv bharat maharashtra
etv bharat maharashtra
author img

By

Published : Nov 27, 2021, 6:30 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज एसआयटीकडून आर्यन खानची चौकशी

आज ड्रग्ज क्रुज प्रकरणात एसआयटी आर्यन खानची चौकशी करणार आहे. तो सद्या जामीनावर असून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे. आर्यनला एका क्रुजवरून एनसीबीने ताब्यात घेतले होते.

  • सरकारच्या इशाऱ्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच -

राज्या सरकारने दिलेल्या पगारवाढीच्या आश्वासनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. दरम्यान, राज्य सरकारने कर्मचारी कामावर न परतल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

  • भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषद -

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात आज भाजपानेते गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • परमबीर सिंह यांची आजही होणार चौकशी

कथीत वसूली प्रकरणातील आरोपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सूरु आहे. आजही त्यांची चौकशी होणार आहे.

  • भारत न्यूझीलंड यांच्यातील कसोटीचा आज तिसऱ्या दिवशी

आज, भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा तिसऱ्या दिवशी असून काल न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 129 धावा केल्यात.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

  • मुंबई - आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्याच्या पाच-सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे, हे मी समजू शकतो. गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत, मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे (Narayan Rane) यांचे आभार, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - राज्याच सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Maharashtra MLC election) रणधुमाळी सुरू आहे. आज (26 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जोरदार राजकीय घडामोडी घडत होत्या. अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत अनेक राजकीय चर्चा सुरूच होत्या. शेवटी तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध (Four Seats Unopposed) करण्याचा निर्णय झाला. दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होणार आहे. सविस्तर वाचा..
  • मुंबई - सध्या सोशल मिडीयावर अमित शाह (Amit shah), शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भेटीचा फोटो गाजत आहे. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावरून महाराष्ट्रातील नेते दिल्लीला जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हातातील कामे सोडून शरद पवार दिल्लीला गेल्याने त्या चर्चांमध्ये अजूनच भर पडली आहे. सविस्तर वाचा...
  • पुणे - कोरोनाच्या काळात रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात 27 हजार 138 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. सविस्तर वाचा....

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.