ETV Bharat / city

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मान्यवरांकडून श्रद्धांजली.... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

author img

By

Published : Nov 26, 2021, 5:53 AM IST

etv bharat maharashtra
etv bharat maharashtra

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • २६/११ च्या हल्ल्यातील 13 वर्ष पूर्ण; शहिदांना मान्यवरांकडून श्रद्धांजली

२६ नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लाला 13 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने विविध मान्यवरांकडून शहिदांना श्रद्धांजली वाहन्यात येईल.

  • मंदा खडसे ईडी चौकशी

पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांची आज चौकशी होणार आहे.

  • आर्यन खान आज एनसीबी कार्यालयात लावणार हजेरी

मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणाती आरोपी आर्यन खान आज एनसीबी कार्यलयात हजर राहणार आहे. तसे आदेश न्यायालयाने आर्यन खानला दिले आहे.

  • परमवीर सिंग पोलीस चौकशी

कथीत 100 कोटी वसुली प्रकरणातील परमवीर सिंग पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे. काल परमवीर सिंग यांची 7 तास चौकशी झाली होती.

  • भाजपा प्रवक्ता व अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष एजाज देशमुख यांची पत्रकार परिषद

भाजपा प्रवक्ता व अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष एजाज देशमुख यांची दुपारी 12.00 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

  • भारत न्युझीलंड कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस

भारत न्युझीलंड कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोर 4 गडी गमावत 258 रन्स होता.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Param Bir Singh ) यांची सात तास चौकशी करण्यात आली. सकाळी 11 वाजल्यापासून कांदिवली क्राइम ब्रांच unit-11 कार्यालयात त्यांची चौकशी सुरू होती. डीसीपी दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत होते. 230 दिवस बेपत्ता असलेले परमबीर सिंग हे पोलिसांसमोर सकाळी हजर झाले. गोरेगाव खंडणी प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. उद्या पुन्हा त्यांची चौकशी होऊ शकते. सविस्तर वाचा...

मुंबई - माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण ( Shamsher Pathan allegations ) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप ( Shamsher Pathan allegations against Param Bir Singh ) केले आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पोलिसांनी पकडले, त्यावेळी अजमल कसाब याच्याकडे सापडलेला मोबाईल फोन परमबीर सिंग ( Param Bir Singh ) यांनी लपवला, असा खळबळजनक आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे. सविस्तर वाचा...

मुंबई - नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, मी यापुढे समीर वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल कुठलीही पोस्ट करणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minority Minister Nawab Malik ) यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र देण्यात आले आहे. या हमीपत्रात 9 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीपर्यंत समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत कोणतेही वक्तव्य प्रसारमाध्यमांवर किंवा सोशल मीडियावर करणार नाही असे लिखित स्वरूपात देण्यात आले आहे. सविस्तर वाचा...

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू ( Primary schools to start in Maharashtra ) होणार आहेत. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या ( Maharashtra cabinet decision ) बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.