ETV Bharat / city

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - todays news

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

ETV BHARAT TODAYS TOP NEWS
ETV BHARAT TODAYS TOP NEWS
author img

By

Published : Nov 25, 2021, 6:32 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय तसेच एसटी कर्मचाऱयाच्या मागण्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • भाजपा नेत्या आणि खासदार हिना गावित यांची पत्रकार परिषद

आज भाजपा नेत्या आणि खासदार हिना गावित यांची पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यलयात पार पडणार आहे.

  • वेला सबमरीनचा भारतीय नौसेनेत प्रवेश

आज वेला सबमरीनचा भारतीय नौसेनेत प्रवेश होणार आहे. वेला ही चौथी सबमरीन असणार आहे. हा सोहळा सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान पार पडेल.

  • भाजपाचे नेते माधव भंडारी यांची पत्रकार परिषद

दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने अनेक घोटाळे केल्याचा आरोप भाजपाच्यावतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर माधव भंडारी पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • आज भारत-न्युझीलंड कसोटी मालिकेला सुरूवात

आज भारत-न्युझीलंड कसोटी मालिकेला सुरूवात होणार असून पहिला सामना 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान खेळण्यात येईल.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

  • मुंबई : राज्याला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. खास करून दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. आता दुसरी लाट जवळपास ओसरली असली तरीही, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची(Third Wave of Corona) शक्यता नाकारता येत नाही. मात्र ही लाट अगदी सौम्य प्रमाणात असेल असे एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर गुलेरिया आणि वेलोरा इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जेकब जॉन यांनी सांगितल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Strike) यश येताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वाचा...
  • सातारा - चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आता काही काम उरले नाही. त्यामुळे त्यांनी आता भाकीत व्यक्त करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पाटलांची खिल्ली उडवली. कोणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भविष्यात एकत्र लढलो तर पुढील पाच वर्षे देखील राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा....
  • औरंगाबाद - 25 नोव्हेंबर हा दिवस जगातील महिला अत्याचार विरोधी दिवस (International Day For The Elimination Of Violence Against Women) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अत्याचार कमी झाल्याबाबत आनंद व्यक्त करायला हवा. मात्र, तसे न होता, महिला अत्याचारात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात पूर्वी महिला घराबाहेर असुरक्षित असल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता महिला घरात देखील असुरक्षित असल्याचं दिसून येत आहे, असं मत महिला अभ्यासक मंगल खिवंसरा (Mangal Khivansara ) यांनी व्यक्त केलं. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.