आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- शिवसेना खासदार भावना गवळी आज ईडीच्या कार्यलयात
शिवसेना खासदार भावना गवळी चौकशीसाठी ईडी कार्यालयत हजर राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने भावना गवळी यांना समन्स पाठवला होता.
- आज एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता
काल सह्याद्री गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीनंतर आज एसटीच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यांना अनिल परब हे माध्यामांशी संवाद साधतील.
- अमरावती : श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उद्धघाटन
श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्धघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ह्स्ते होणार आहे.
- आजपासून पुरूष पुरुष हॉकी कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरूवात -
पुरुष हॉकी कनिष्ठ गटाची विश्वचषक स्पर्धा येत्या २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत ओडिशा इथं होणार आहे. सोळा देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. २०२३ साली होणाऱ्या पुरुष हॉकी विश्व् चषक स्पर्धेचं आयोजनही ओडिशा मधल्या भुवनेश्वर आणि रुरकेला इथं होणार आहे.
- भाजपाचे राष्ट्रीय सचिवर विजय राहटकर यांची पत्रकार परिषद
आज भाजपाचे राष्ट्रीय सचिवर विजय राहटकर यांची दुपारी 12 वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे.
- भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद
आज भाजपाच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ या पत्रकार परिषद घेणार आहेत.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
- मुंबई - राज्यात मंगळवारी (दि. 23) 766 नव्या रुग्णांची (Corona Update) नोंद झाली असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 929 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - शीख समुदायाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fir filed against actress kangana ranaut) मुंबईतील खार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (khar police station) सविस्तर वाचा..
- मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी- बारावीच्या परीक्षा (SSC-HSC Exam) रद्द करण्यात आल्या होत्या. आता प्रभाव कमी झाल्याने आगामी परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत शिक्षण विभागाच्या बैठकीत एकमत झाले आहे. मात्र राज्य शासन स्तरावर स्वतंत्रपणे आढावा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी यावेळी स्पष्ट केले. सविस्तर वाचा....
- सांगली - इस्लामपूर येथील महाविद्यालय तरुणावर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी पोलीस कर्मचारी हणमंत देवकर याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली आहे. पीडित तरुणाकडे तिच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंधास नकार दिल्याने देवकर याने पीडित तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करत खंडणी घेतल्याचा प्रकार घडला होता. सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
VIDEO : 24 नोव्हेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
24 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज रागावर संयम ठेवावा लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य