ETV Bharat / city

थोडक्यात महत्त्वाचे.. राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील घडामोडींचा थोडक्यात आढावा

मुंबईत रविवारी 1 हजार 105 नवे रुग्ण आढळले असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 393 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा 1 लाख 16 हजार 451 वर पोहचला आहे.

etv bharat special thodkyat mahtvache
etv bharat special thodkyat mahtvache
author img

By

Published : Aug 2, 2020, 8:16 AM IST

Updated : Aug 2, 2020, 10:35 PM IST

मुंबई - राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील घडामोडींचा थोडक्यात आढावा.

थोडक्यात महत्त्वाचे…

मुंबईत रविवारी कोरोनाचे 1 हजार 105 नवे रुग्ण

मुंबईत रविवारी 1 हजार 105 नवे रुग्ण आढळले असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 393 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा 1 लाख 16 हजार 451 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 444 वर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 88 हजार 299 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 21 हजार 412 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 76 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 78 दिवसांवर पोहचला आहे.

नागपूरात कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 897 वर

राज्याची उपराजधानी नागपूरात कोरोनाचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. रविवारी दिवसभरात २३५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ५८९७ इतकी झाली आहे. यामध्ये १०८ रुग्ण हे नागपूर जिल्ह्या बाहेरील आहेत. तर १८३९ रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत आणि ४०५८ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. सध्या नागपुरातील २२ ठिकाणी १९६७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६१.३० टक्के इतके आहे,तर मृत्यू दर हा २ ५७ इतका आहे

यवतमाळ जिल्ह्यात 455 रुग्णांवर उपचार सुरू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 61 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात नव्याने 30 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत 425 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात रविवारी 30 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 455 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 61 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 394 आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1145 झाली आहे. यापैकी 722 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 29 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 115 जण भरती आहे.

जळगावात रविवारी विक्रमी 365 रुग्णांची नोंद

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. रविवारी जिल्ह्यात विक्रमी 365 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, रविवारी एकाच दिवशी 13 रुग्णांचा उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजार 753 इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक 92 रुग्ण हे जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 29, भुसावळ 28, अमळनेर 29, चोपडा 45, पाचोरा 30, भडगाव 15, धरणगाव 7, यावल 7, एरंडोल 4, जामनेर 16, रावेर 15, पारोळा 8, चाळीसगाव 34, बोदवड 5 तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील 1 असे एकूण 365 रुग्ण नव्याने समोर आले आहेत.

भंडारा जिल्ह्यात 16 रुग्णांची भर

भंडारा जिल्ह्यत आज 16 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 7, साकोली 2, तुमसर 3, मोहाडी 1, पवनी 1 तर लाखनी तालुक्यातील 2 व्यक्तीचा समावेश आहे. 16 पैकी 15 रुग्ण हे कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग स्टील कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला असून एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कंपनीतील इतर कामगारांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.

नांदेडमध्ये रविवारी 14 रुग्ण झाले पुर्णपणे बरे

जिल्ह्यात कोरोनामुळे अतिगंभीर आजारी असलेल्या 14 रुग्णांवर यशस्वी औषधोपचार करुन बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात 60 वर्षापेक्षा अधिक अशा रुग्णांचा समावेश आहे. यातील एक 72 वर्षीय वयोवृद्ध 12 दिवस व्हेंटिलेटरवर राहून 33 दिवसानंतर मृत्यूशी जिंकून आता बरे होऊन घरी जात असल्याचे आम्हा सर्व टिमला आनंद असल्याचे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 871 बाधित रुग्णांची नोंद,797 जण कोरोनामुक्त

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात 871 जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 8 जनांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, रविवार 797 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 हजार 934 वर पोहचली असून पैकी, 15 हजार 479 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 704 एवढी आहे. संबंधित रुग्णांवर कोविड सेंटर आणि महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मीरा भाईंदरमध्ये १४९ कोरोनाबधित वाढले, १४६ रुग्ण कोरोनामुक्त!

मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवशी कोरोना मुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४९ जणांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

आला आहे. त्यामुळे १४९ नवीन रुगणांची भर पडली आहे. १४६ जणांनी आज कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २६२१९ जणांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली यामध्ये १६ हजार ९९९ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आलं आहे. तर ८ हजार ४६३ जणांचा कोरोनाची बाधा झाल्याचा आढळून आले आहे. ७५७ जणांचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. तर १ हजार ३६० जणांवर मीरा भाईंदर शहरातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत १२४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळूले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालघरमध्ये आढळले १२४ कोरोना रुग्ण

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या १२४ कोरोना रुग्णांपैकी ५० रुग्ण पालघर तालुक्यातील असून २६ डहाणू तालुक्यातील, १० वाडा तालुक्यातील, २ विक्रमगड तालुक्यातील, १ जव्हार तालुक्यातील, १० मोखाडा व २५ वसई ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ३६८ इतकी झाली असून, ५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ५५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७५९ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

नांदेड जिल्ह्यात रुग्णसंख्या पोहचली दोन हजाराच्या उंबरठ्यावर !

आज कोरोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला असून जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी देखील शतकी रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. गत 24 तासांमध्ये तब्बल 147 रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. परंतू त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. आजवर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1986 वर पोहचली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.....!

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 367,

घेतलेले स्वॅब- 15 हजार 75,

निगेटिव्ह स्वॅब- 11 हजार 764,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 147,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 986,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 21,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,

मृत्यू संख्या- 83,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 935,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 957,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 252.

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ३३ नवे रुग्ण

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे आज गोंदिया येथील प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे. आज तर तब्बल ३३ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून क्रियाशील रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. गोंदियातील सिव्हिल येथील एक रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतला आहे. जिल्ह्यात २३० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

भंडाऱ्यात 7 लोक कोरोनामुक्त

7 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 5 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 4 तर लाखनी तालुक्यातील 1 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 204 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 255 झाली असून 45 क्रियाशील रुग्ण तर 4 संदर्भित रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 02 आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी तब्बल ५३५ नव्या रुग्णांची भर

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजले पासून सायंकाळी (शनिवारी) सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१७ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७९५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली.

Last Updated : Aug 2, 2020, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.