मुंबई - भारतात अनेक रेल्वे स्थानकं आहेत. या रेल्वे स्थानकांमध्ये सगळा कारभार स्टेशन मास्तर पाहत असतात. स्थानकात एखादं काम करायचं असेल, तर याबाबत त्या मास्तरला रेल्वे प्रशासनाला विचारावे लागते. परवानगी नसल्या कारणाने अनेक स्थानकातील कामं रखडल्याचे चित्र पाहायला मिळतात. मात्र, या चित्राला अपवाद ठरले आहेत ते मुंबईतील 'किंग सर्कल' स्थानक... कारण या स्थानकातील स्टेशन मास्तरांनी एकेकाळी घाणीचे साम्राज्य आणि ज्या स्थानकात कोणी फिरकत, नसे अशा स्थानकाला लोकांच्या आणि ट्रस्टच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या खिशाला कात्री लावत, स्वच्छ आणि सुंदर स्थानक बनवले आहे. मुंबईसह भारतात स्वच्छतेबाबत अव्वल स्थानक बनवण्यासाठी ते आता काम करत आहेत.
हेही वाचा - देशात प्रथमच येणार कलाकार रोबो, मुंबई आयआयटीमध्ये सादर करणार कला
स्थानकाची पूर्वी असलेली भकास परिस्थिती बदलण्याचे काम सहा वर्षापूर्वी स्थानकात रूजू झालेले स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा यांनी केले आहे. एन. के. सिन्हा असे त्या स्टेशन मास्तरांचे नाव आहे. ते स्थानकाला आपल्या घराप्रमाणे मानतात आणि त्या स्थानकाची देखभाल करतात. सिन्हा यांनी रेल्वे स्थानकातील केलेले सौंदर्यीकरण आणि स्वच्छता याबद्दल त्यांचे रेल्वे मंत्र्यांसह इतर स्थानकातील स्टेशन मास्तर आणि रेल्वेतील अधिकारी प्रशंसा करतात.
'स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019' रँकिंगच्या सर्वेक्षणानुसार उपनगरी असलेल्या स्थानकांमध्ये 'किंग सर्कल' स्थानकाने आठवा क्रमांक पटकावला आहे. या स्थानकातील स्वच्छता आणि सौंदर्यीकरण पाहून रेल्वेतील सर्वेक्षण करणारे अधिकारी तसेच मुंबईकर जनता आवाक झाली. कारण, एकेकाळी हे स्थानक भकास स्थानक म्हणून ओळखले जायचे. मात्र, स्थानकाच्या प्रत्येक ठिकाणाला आता स्वच्छ केलेले आहे. त्यामुळे संपूर्ण स्थानक स्वच्छ झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. तसेच सामाजिक संदेश देणारे मेसेज या स्थानकात लिहिण्यात आलेले आहेत. स्थानकाच्या शेजारी असलेल्या गार्डनची संख्या वाढवण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे मेसेज हे येथील प्रवाशांना आकर्षित करतात. या स्थानकात एखादा कागदाचा तुकडाही दिसत नाही. त्यामुळेच हे स्थानक सर्वांना आकर्षित करत आहे. मुंबईतल्या तसेच भारतातल्या इतर स्थानकांपैकी हे स्थानक सर्वांना आपलंस वाटत असल्याचे येथील प्रवास करणारे नागरिक सांगतात.
हेही वाचा - इथं ओरडण्यापेक्षा केंद्रात जाऊन ओरडा, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
देशात एकीकडे अधिकारी काम करत नाहीत. कामचुकारपणा करतात, अशी लोकांची मतं असतात. परंतु, किंग सर्कल स्थानकातील स्टेशन मास्तर हे प्रामाणिकपणे आपलं काम परम कर्तव्य समजून दिवस-रात्र मेहनत घेत स्थानकाला अव्वल दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करतात.
कोण आहेत हे स्टेशन मास्तर
नितेश कुमार सिन्हा हे 10 ऑगस्ट 1991 मध्ये रेल्वे बोर्डात भरती झाले. त्यांनी 1993 पासून असिस्टंट स्टेशन मास्तर म्हणून देहूरोड येथे धुरा सांभाळली. तेथून प्रवास सुरू झाला तो शिवडी, सीएसटी यार्ड, वडाळा आणि आता ते किंग सर्कल स्थानकात मुख्य स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. किंग सर्कल स्थानक वगळता ते प्रत्येक स्थानकात असिस्टंट म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आधी असिस्टंट स्टेशन मास्तर असल्याने त्यांना निर्णय घेता येत नव्हते. परंतु, किंग सर्कल स्थानकात जेव्हा मुख्य स्टेशन मास्तर म्हणून रूजू झाले, त्यानंतर त्यांनी आपल्या कामातून आपली छबी लोकांसह रेल्वे मंत्रालयाला दाखवली आहे.
किंग सर्कल या स्टेशनला ते आपल्या घराप्रमाणे समजत तेथील स्वच्छता आणि सौंदर्य जपतात. कारण, स्थानक हेच आपले घर असते आणि त्यातच नोकरी करून घर चालते त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून किंग सर्कल स्थानकात सिंह काम करत आहेत. त्यांनी किंग सर्कल स्थानकाचा कायापालट केला आहे. अगदी स्वच्छतेपासून ते कलर मारण्याबरोबर त्यांची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी स्वतः आणि लोकांच्या मदतीने त्यांनी स्थानकात काम केलं आहे. यामुळे किंग सर्कल स्थानकाला यंदा 2019 चा स्वच्छ व सुंदर स्थानकांच्या सर्वेक्षणात आठव्या क्रमांकाचे स्थान मिळाले होते. तसेच इतर संघटनांकडून देखील या स्थानकाला अवॉर्ड मिळालेले आहेत. तसेच नागरिक व रेल्वे मंत्रालयाकडून देखील सन्मान मिळालेला आहे.
सिन्हा यांचे काम प्रत्येक स्टेशन मास्तरांनी आत्मसात करण्यासारखे आहे. त्यामुळे नक्कीच सिंह यांच्याकडे पाहून भारतातील तसेच मुंबईतील स्टेशन मास्तर प्रेरणा घेतील.