ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती; स्वस्तात होणार उपलब्ध

author img

By

Published : Apr 13, 2020, 1:11 PM IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला अधिक महत्व आहे. परिणामी, सॅनिटायझरची मागणी सर्वाधिक वाढली आहे. मात्र, एकाचवेळी मागणी वाढल्याने मागणी आणि पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाली. त्यामुळे शासनाने सॅनिटायझर निर्मितीबाबत साखर कारखान्यांना आवाहन केले होते. त्यानुसार राज्यातील 43 साखर कारखान्यांना सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी परवाणगी देण्यात आली आहे.

sugar factories producing sanitizer
साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती

मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेले मास्क आणि सॅनिटायझरचा मोठा तुटवडा सध्या बाजारामध्ये निर्माण झाला. त्यामुळे बनावट सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, आता सॅनिटायझरचा तुटवडा कमी होणार आहे. याचे कारण राज्यातील विविध साखर कारखान्यातून तयार होत असेलेले सॅनिटायझर बाजारामध्ये उपलब्ध होत आहे. प्रशासनाकडून राज्यातील 43 साखर कारखाने आणि कंपन्यांना सॅनिटायझर निर्मितीसाठी परवानग्या देण्यात आल्या आहेत. या 43 कारखान्यांमधून दररोज 1 हजार लिटरपासून 1 लाख 20 हजार लिटरपर्यंत सॅनिटायझरची निर्मिती करण्यात येत आहे.

कोरोना विरुद्ध लढा... साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती

महाराष्ट्रात एकूण साखर कारखान्यांपैकी 110 साखर कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत. यापैकी 80 अल्कोहोल निर्मिती प्रकल्प यावर्षी सुरु होते. या साखर कारखानदारांनी सॅनिटायझर बनवण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. सॅनिटायझर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अल्कोहोल आहे. ज्या साखर कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत, त्यांनी सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : कोरोना आणि लॉकडाऊनचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरील परिणाम

राज्यात 43 साखर कारखाने तसेच विविध कंपन्यांना देखील स‌ॅनिटायझर निर्मितीची परवानगी

लॉकडाऊन लागू करण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 23 मार्चपासून ठिकठिकाणच्या प्रशासनाने सॅनिटायझर निर्मितीसाठी पुढाकार घेणारे साखर कारखाने, कंपन्या यांसाठी परवानग्या दिल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 15, सांगली जिल्ह्यातील 4, सातारा जिल्ह्यातील 9, सोलापूर जिल्ह्यातील 11, कोल्हापूर जिल्ह्यातील 3, नाशिक जिल्ह्यातील 5, अहमदनगर जिल्ह्यातील 8, पालघर 7, औरंगाबाद जिल्ह्यातील 4, उस्मानाबाद जिल्ह्यातील 5, नागपूर जिल्हयातील 2, तर जालना, बीड, परभणी, लातूर, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एका साखर कारखान्याचा समावेश आहे. या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा, पोलीस सुरक्षा यंत्रणा, सफाई यंत्रणा तसेच इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांना मोफत सॅनिटायझर काही साखर कारखान्यांकडून पुरवले जात आहे. या कारखान्यांमधून क्षमतेनुसार 2 हजार लिटर प्रतिदिनपासून 1 लाख 20 हजार लिटर प्रतिदिन सॅनिटायझर निर्मिती होत आहे.

सध्या बाजारात स‌ॅनिटायझरचा तुटवडा असल्याने साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर बाजारात आल्यास लोकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे इतर सॅनिटायझरच्या तुलनेनं स्वस्त असणार आहे.

हेही वाचा.... ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात

राज्यात सध्या खालील ठिकाणच्या साखर कारखान्यांमधून होत आहे स‌ॅनिटायझरची निर्मिती

1. पुणे

बाजारामध्ये सॅनिटायझरचा तुटवटा निर्माण होत असल्याचे निर्दशनास येत असल्याने यावर तोडगा म्हणून आणि शासनाच्या आवाहनानुसार निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने हॅण्ड सॅनिटायझर निर्मितीस प्रारंभ केला आहे. हे हॅण्ड सॅनिटायझरचे शासनाचा आरोग्य विभाग म्हणजे सर्व सरकारी दवाखाने, तहसील विभागाचे सर्व कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी, सर्व पोलीस ठाणे, नगरपालिका आणि कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना मोफत वाटप करण्यात येत असल्याचे विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात स‌ॅनिटायझर निर्मितीला सुरुवात...

2. कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 16 साखर कारखाने आहेत. त्यातल्या हसन मुश्रीफ यांच्या सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याने सॅनिटायझर तयार करायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सॅनिटायझर तयार करणारा हा एकमेव कारखाना आहे. सद्या सर्व शासकीय, प्रशासकीय यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना याचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

3. सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात दररोज दीड लाख लिटर सॅनिटायरजचे उत्पादन सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणारे हे सॅनिटायजर महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांना देखील पाठवण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे असलेल्या डिस्लरी प्रकल्पामधून सॅनिटायजरची निर्मिती केली जात आहे. भारतातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यात 40 पेक्षा अधिक साखर कारखाने आहेत. यापैकी अनेक साखर कारखान्याकडे उसापासून अल्कोहोल निर्मिती करणारे प्रकल्प आहेत. याच अल्कहोल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना सॅनिटायजर तयार करण्याला शासनाने मंजूरी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना तसेच काही डिस्लरी प्रकल्पांना सॅनिटायजर बनविण्याला परवानगी दिल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातून जवळपास दररोज दीड लाख लिटर सॅनिटायजर तयार होऊ लागले आहे.

माळशिरस तालुक्यातील श्रीपुरच्या ब्रिमा सागर, माढा तालुक्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन, मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर, बीबीदारफळ लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज, पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, मंगळवेढ्यातील फॅबटेक शुगर, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर, तसेच टेंभुर्णी एमआयडीसीमधील खंडोबा डिस्टलरी आणि सोलापूर एमआयडीसीमधील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह डिस्टलरी यांना देखील सॅनीटायझर निर्मितीचा परवाना देण्यात आला आहे.

sugar factories producing sanitizer
नागरिकांना स्वस्तात उपलब्ध होणार सॅनिटायझर

4. जळगाव

जळगाव जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्यात डिस्टीलरी प्रक्रिया प्रकल्प अस्तित्त्वात नसल्याने स‌ॅनिटायझर निर्मिती अशक्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने साखर कारखान्यांना सॅनिटायझरची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, जळगाव जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्यात डिस्टीलरी प्रक्रिया प्रकल्प अस्तित्त्वात नाही. त्यामुळे त्यांना सॅनिटायझर निर्मिती करणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई सहकारी साखर कारखाना, फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना, चोपडा येथील चोपडा सहकारी साखर कारखाना, चाळीसगाव येथील बेलगंगा सहकारी साखर कारखाना, कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना, गोंडखेल येथील साखर कारखाना, असे 6 साखर कारखाने आहेत. परंतु, संत मुक्ताई साखर कारखाना वगळता आजमितीस एकही साखर कारखाना सुरू नाही. त्यातही वसंत सहकारी साखर कारखाना, बेलगंगा सहकारी साखर कारखाना, मधुकर सहकारी साखर कारखाना, चोपडा सहकारी साखर कारखाना हे डबघाईला गेले आहेत. तर गोंडखेलच्या साखर कारखान्याचे धुराळेच पेटले नाही. त्यामुळे बंद असलेल्या या साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझर निर्मिती अशक्य आहे.

मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामात तब्बल 10.68 चा उच्चांकी उतारा गाठून मागील उताऱ्याच्या आकड्यांना मागे टाकले. तसेच वीज निर्मिती प्रकल्पातून 63 लाख 56 हजार युनिट वीज विक्री केली आहे. यावर्षी पार पडलेल्या गळीत हंगामात संत मुक्ताई साखर कारखाना 3 महिने सुरू होता. त्यात दीड लाख टन उसाचे गाळप करण्यात येऊन सुमारे 1 लाख 53 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. परंतु, या साखर कारखान्यात डिस्टीलरी प्रक्रिया प्रकल्प नाही. त्यामुळे रेक्टिफायर स्पिरीट व इतर उत्पादन निर्मिती करणे शक्य नाही. त्यामुळे सॅनिटायझरचे उत्पादन केले जाऊ शकत नाही, असे कारखान्याच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.