मुंबई - नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. अशी माहिती ईडी कार्यालयाने दिली आहे. ( ED Arrested Sanjay Pandey )
दिल्लीत संजय पांडे यांना अटक - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली ईडीकडून आज अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोलोकेशन फोन टॅपिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. दरम्यान एनएसई घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांच्या कंपनीचा समावेश असल्याचे आरोप त्यांच्यावर होते. तसेच त्यांच्यावर फोन टॅपींग केल्याचे देखील आरोप आहेत. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान ईडीने आज त्यांना अटक केली आहे.
-
The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
— ANI (@ANI) July 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File Pic) pic.twitter.com/KkJJwvSPD4
">The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
— ANI (@ANI) July 19, 2022
(File Pic) pic.twitter.com/KkJJwvSPD4The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
— ANI (@ANI) July 19, 2022
(File Pic) pic.twitter.com/KkJJwvSPD4
कंपनीकडून 4.45 कोटी रुपये मिळाल्याचे समोर - फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर NSE कर्मचाऱ्यांचे कॉल बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. पांडे हे 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना 4.45 कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे.
राजीनाम्यानंतर आयटी कंपनी केली होती सुरू - विशेष म्हणजे याआधी ईडीने देखील संजय पांडे यांची 8 तास चौकशी केली होती. ही चौकशी पांडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील एकूण 18 कोटी रुपयांच्या विविध व्यवहारांबाबत होती. पांडे यांच्या कुटुंबाशीच्या कंपनीशी संबंधित 18 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडी देखील तपास करत आहे. व्यवहाराच्या स्त्रोतासह हे व्यवहार कोणत्या कारणासाठी करण्यात आले होते याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 1986 च्या तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले पांडे हे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले. पांडे यांनी 2001 साली पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान आयटी कंपनी सुरू केली होती.
मुलाला दिले होते कंत्राट - त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. या वेळी त्यांनी 2006 मध्ये कंपनीत आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले. 2010 ते 2015 या कालावधीत या कंपनीला एनएसई सव्र्हर आणि संगणकीय यंत्रणा माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण त्या काळात एनएनईमध्ये कोलोकेशन गैरव्यवहार झाला होता.
सीबीआयचा आरोप - याबाबत 2018 मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावर ईडी या प्रकरणी तपास करत आहे. गैरव्यवहाराबाबतची माहिती आयसेक सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेखापरिक्षणात कशी उघड झाली नाही याबाबत सीबीआय तपास करत आहे. याशिवाय आरोपींनी 2009 ते 2017 या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून एनएसई कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण - संजय पांडे यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी समन्स बजावला आहे. एनएसई सह-स्थान घोटाळ्यात 2018 मध्ये नोंदवलेल्या सीबीआयच्या खटल्याच्या आधारे ईडी तपास करत आहे. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये स्वत:चे आयटी ऑडिट फर्म सुरु केले होते. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचे संचालक केले होते. या फर्मचे Isec Services Pvt Ltd असे नाव होते. या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यावेळी फर्मने दिलेल्या अहवालात कोणतंही उल्लंघन झालेले नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन CBI ने फर्मची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी आता ईडीदेखील चौकशी करत आहे.
फोन टॅपिंग प्रकरणातील अटकेची संख्या वाढली - नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने ( National Stock Exchange phone tapping ) गुन्हे दाखल केले. या प्रकरणात पांडे यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यांना ईडी समोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याच प्रकरणात चित्रा रामकृष्णन यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. याच प्रकरणात आणखी काही जणांना अटक झाल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच आता याच प्रकरणात संजय पांडे यांनाही अटक करण्यात आले आहे. जसेजसे तपास पुढे जाईल तसतशी या प्रकरणातील अटक होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
पांडे यांच्यावर आहेत हे आरोप - काही दिवसांपूर्वीच ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. तसेच स्टॉक एक्स्चेंजच कर्मचाऱ्यांच्या अवैध फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणात पांडे यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच दुसरीकडे यापूर्वी सीबीआयनेही पांडेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. नारायण आणि रामकृष्ण या दोघांनी शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप आहे. या कामासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीची मदत घेतली होती, असा आरोप पांडे यांच्यावर करण्यात आलाय. त्यामुळे याच प्रकरणात आता त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लागला आहे.
हेही वाचा - Nupur Sharma : नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा, 10 ऑगस्टपर्यंत अटकेवर स्थगिती