मुंबई - मध्य रेल्वेच्या विजेवर चालणाऱ्या लोकलचे आज ९५ वर्षात पदार्पण झाले. या निमीत्त सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मुंबई विभागातील निवृत्त कर्मचारी वीणाधरन पी टी यांनी मध्य रेल्वेतील विजेवर चालणाऱ्या लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. फेब्रुवारी 1925 रोजी मुंबईच्या तत्कालीन राज्यपाल सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते 4 कारसह प्रथम विजेवर चालणाऱ्या लोकल सेवेचा शुभारंभ झाला होता. पहिली सेवा तत्कालीन बॉम्बे व्हिटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते हार्बर मार्गावरील कुर्ला पर्यंत धावली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एक विजेवर चालणाऱ्या लोकलचे पत्रक ही प्रकाशित केले.
वर्षानुसार बदलत गेलेले विजेवर चालणाऱ्या लोकलचे प्रकार -
1925 | हार्बर मार्गावर | 4-कार(डब्बे) |
1927 | मेन लाइन आणि हार्बर मार्ग | 8-कार (डब्बे) |
1961 | मेनलाईनवर | 9-कार (डब्बे) |
1986 | मेनलाइनवर | 12-कार(डब्बे) |
1987 | कर्जतच्या दिशेने | 12-कार(डब्बे) |
2008 | कसाऱ्याच्या दिशेने | 12- कार (डब्बे) |
2010 | ट्रान्सहार्बर लाइनवर | 12-कार (डब्बे) |
2012 | मुख्य मार्गावरील | 15-कार (डब्बे) |
2016 | हार्बर मार्गावर | 12-कार (डब्बे) |
2020 | ट्रान्सहार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल |