ETV Bharat / city

राज्यात २०२० मध्ये १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार - नवाब मलिक - Mahasvayam Webportal

कोरोना संकटकाळात निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Jan 19, 2021, 4:05 PM IST

मुंबई- कोरोना संकटकाळात निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याद्वारे राज्यात फक्त डिसेंबर महिन्यात ३४ हजार ७६३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, तर जानेवारी ते डिसेंबर २०२० या संपूर्ण एका वर्षाच्या कालावधीत १ लाख ९९ हजार ४८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात कौशल्य विकास विभागाने महत्वाची भूमिका बजावली आहे, अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम-

मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

डिसेंबरमध्ये ३४ हजार ७६३ बेरोजगारांना मिळाला रोजगार-

डिसेंबरमध्ये विभागाकडे ८९ हजार ३२८ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात १२ हजार ६८०, नाशिक विभागात २२ हजार ८४४, पुणे विभागात २० हजार ९४५, औरंगाबाद विभागात १६ हजार ५३०, अमरावती विभागात ८ हजार ६६६ तर नागपूर विभागात ७ हजार ६६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ३४ हजार ७६३ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ९०२, नाशिक विभागात १४ हजार ९२०, पुणे विभागात ६ हजार ८२६, औरंगाबाद विभागात ८ हजार १४५, अमरावती विभागात ३ हजार ९२८ तर नागपूर विभागात ४२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

महारोजगार मेळाव्यास मोठे यश-

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये १२ ते २० डिसेंबर २०२० दरम्यान झालेल्या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास मोठे यश मिळाले. यामध्ये राज्याच्या विविध भागातून ४९७ उद्योगांनी त्यांच्याकडील ८६ हजार ४३५ रिक्तपदे या मेळाव्यातून भरण्यासाठी खुली केली. या पदांसाठी १ लाख ६० हजार ८२७ बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ५ हजार २८१ उमेदवारांना आतापर्यंत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून उर्वरिक्त रिक्त पदांची भरतीप्रक्रीया सुरु आहे, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

रोजगाराची ही चळवळ यापुढील काळातही सुरुच राहणार-

रोजगाराची ही चळवळ यापुढील काळातही सुरुच राहणार आहे. यासाठी नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा- धर्माला बदनाम करण्यासाठी हिंदूच कारणीभूत - राजू श्रीवास्तव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.